Nashik Water Supply : शहराचा विस्तार वाढत असताना पाणीपुरवठ्यासारख्या समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्या आहेत. त्याअनुषंगाने जुन्या जीर्ण झालेल्या व कमी व्यासाच्या जलवाहिन्या बदलण्यांबरोबरच नवीन नगरामध्ये मोठ्या व्यासाच्या जलवाहिन्या टाकण्यासाठी अमृत-२ योजनेतून महापालिकेला ३४२ कोटी रुपये मंजूर झाले आहेत.
त्या कामाच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वीच कार्यारंभ आदेश देऊन प्रत्यक्ष कामाला सुरवात करण्याचे पाणीपुरवठा विभागाचे नियोजन आहे. जवळपास चारशे किलोमीटर लांबीच्या नवीन जलवाहिन्या शहरात टाकल्या जाणार आहेत. एकूण निधीपैकी महापालिकेला जवळपास १७५ कोटी रुपये स्वनिधी खर्च करावा लागणार आहे. (problem of water supply will solved)
अमृत-१ योजनेंतर्गत आराखडा सादर करण्यात आला होता. पहिला आराखडा सादर करण्यास विलंब झाल्याने अमृत-२ मध्ये प्रस्तावाचा समावेश करण्यात आला. परिणामी किमतीत वाढ झाली. तब्बल साडेतीनशे कोटीपर्यंत खर्च पोचला. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची तांत्रिक मान्यता त्यानंतर राज्य शासनाची अंतिम मान्यता मिळाल्यानंतर निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे.
मार्च २०२६ पर्यंत काम पूर्ण करण्याचे महापालिकेचे उद्दिष्ट आहे. विलंब झाल्यास वाढीव खर्चाचा भार महापालिकेला सोसावा लागणार आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रकल्प नाशिकसाठी महत्त्वाचा आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने प्लॅस्टिक मटेरिअल वापरण्याचा आग्रह धरला होता.
परंतु, प्लॅस्टिक जलवाहिन्या नादुरुस्त होण्याची अधिक शक्यता असल्याने महापालिकेने लोखंडी पाइपचा आग्रह धरल्याने प्रकल्पाचा खर्च वाढला. एकूण ३४२ कोटींचा प्रकल्प असला तरी त्यात निव्वळ २८६ कोटींचा प्रस्ताव आहे. उर्वरित रक्कम जीएसटी स्वरूपात अदा करावी लागणार आहे. प्रकल्पासाठी अमृत- २ योजनेअंतर्गत केंद्र व राज्य शासनाकडून प्रत्येकी २५ टक्के निधी प्राप्त होणार आहे. उर्वरित ५० टक्के निधी महापालिकेला खर्च करावा लागणार आहे.
"शहरात जवळपास ४०० किलोमीटर लांबीच्या नवीन जलवाहिन्या टाकल्या जाणार आहे. या माध्यमातून शहरातील पाणीपुरवठ्याची समस्या निकाली निघेल."
- रवींद्र धारणकर, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा.
अशी आहे योजना
- शिवाजीनगर, गांधीनगर जलशुद्धीकरण केंद्राचे नूतनीकरण.
- जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरुस्तीसाठी ११.१२ कोटीचा खर्च.
- चेहेडी पंपिंग ते नाशिक रोड जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत मुख्य वितरण वाहिनी बदलणार.
- कार्बन नाका ते रामालय जलकुंभापर्यंत ७०० मिमी व्यासाची जलवाहिनी टाकणे.
- शिवाजीनगर, बाराबंगला, गांधीनगर जलकुंभाच्या पीएससी जलवाहिनी बदलणे.
- पंचवटी जलशुद्धीकरण केंद्र ते शक्तीनगरपर्यंत ६०० मिमी व्यासाची नवीन जलवाहिनी.
- नवीन जलवाहिनीसाठी ९५.२० कोटींचा खर्च करणार.
- शहरातील जुन्या व जीर्ण जलवाहिन्या बदलणार.
- नवनगरांमध्ये नवीन जलवाहिन्या टाकणार.
- नवीन जलवाहिन्यांसाठी १७९.२१ कोटी खर्च.
- लव्हाटेनगर जलकुंभातून २४ तास पाणीपुरवठा योजना.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.