नाशिक : देशातील वेगाने वाढणाऱ्या शहरात नाशिकचे नाव पहिल्या दहा शहरांमध्ये आले आहे. परंतु शहर वाढत असताना अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. या समस्या मुख्यत्वे गावठाण व व्यापारी पेठेत आहे. पार्किंग, अतिक्रमणे, घंटागाडी, सीसीटीव्ही कॅमेरे, विविध कारणांनी होणारी दंडात्मक कारवाई, सुरक्षा, वाहतूक व्यवस्थेशी निगडित या समस्या आहेत. या समस्या सोडविताना किंवा नवीन सेवा-सुविधांची निर्मिती करताना समस्यांवर तोडगा निघाला पाहिजे.
तोडगा काढताना कुठल्या घटकाचे नुकसान होता कामा नये. विशेष करून काम करणाऱ्या छोटा वर्गाच्या गरजेचीदेखील दखल घेऊन महापालिका व पोलिस प्रशासनाने अंमलबजावणी करावी. त्यासाठी मोठे व छोटे व्यापारी, दुकानदार सहकार्य करण्यास तयार आहे. परंतु, या समस्या कायमस्वरूपी निकाली लागल्या पाहिजे. असा सूर ‘सकाळ संवाद’ मध्ये व्यक्त करण्यात आला. (Merchants demand in SAKAL Samvad regarding problems)