V. N. Naik Institution Election : वारसांना सभासदत्व देण्यावर भर; चारही पॅनलकडून प्रचारादरम्‍यान ग्‍वाही

Nashik News : नाईक शिक्षण संस्‍थेच्‍या पुढील पंचवार्षिक निवडणुकीत नवमतदार अर्थात, मृत सभासदांच्या वारसांना मतदानाचा हक्‍क देण्याची ग्वाही निवडणूक रिंगणातील चारही पॅनलकडून दिली जात आहे.
V. N. Naik Institution Election
V. N. Naik Institution Electionesakal
Updated on

Nashik News : क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्‍थेच्‍या पुढील पंचवार्षिक निवडणुकीत नवमतदार अर्थात, मृत सभासदांच्या वारसांना मतदानाचा हक्‍क देण्याची ग्वाही निवडणूक रिंगणातील चारही पॅनलकडून दिली जात आहे. त्यामुळे पुढील निवडणुकीत त्यांना मतदानाचा हक्क मिळेल. अर्थात, कुठेही पॅनल किंवा उमेदवार निवडून आल्‍यास, त्‍यांना आश्‍वासनपूर्ती करताना सभासदत्‍वाचा विषय मार्गी लावावा लागणार, हे मात्र निश्चित!

नाईक शिक्षण संस्‍थेच्या पंचवार्षिक निवडणुकीची प्रक्रिया सध्या सुरू आहे. चारही पॅनलकडून विविध मुद्यांवर प्रचार केला जात आहे. या चारही पॅनलमधील प्रचारातील एक मुद्दा समान असून, तो सभासदांच्‍या जिव्‍हाळ्याचादेखील आहे. मृत सभासदांच्‍या वारसांना सभासदत्‍व देण्यासाठी यापूर्वी विशेष सभा घेण्यात आली होती.

परंतु कायदेशीर प्रक्रिया पूर्णच झालेली नसल्‍याने यंदाच्‍या निवडणुकीतील मतदारयादीत नवमतदारांची नोंद होऊ शकली नाही. विशेष सभेसंदर्भातही हेवेदावे कायम आहेत. असे असले तरी सध्या सुरू असलेल्‍या निवडणूक प्रचारात मृत सभासदांच्‍या वारसांना सभासदत्‍व देण्याचे आश्‍वासन चारही पॅनलचे उमेदवार देत आहेत.

निवडणूक पार पडल्‍यानंतर आश्‍वासन पूर्तीसाठी पाच वर्षांचा कालावधी असणार आहे. गेल्‍या काही निवडणुकांपासून सभासदत्‍वाचा मुद्दा रेंगाळत आहे. त्यातच शंभर वर्षांपेक्षा जास्‍त जुन्‍या संस्‍थेतील अनेक सभासद वयस्‍कर आहेत. त्‍यामुळे पुढील पंचवार्षिकपूर्वी मृतांच्‍या वारसांना सभासदत्‍व देण्याबाबत कार्यकारिणीला ठोस निर्णय घ्यावा लागणार आहे. (latest marathi news)

V. N. Naik Institution Election
Nashik News : प्रत्येक घरात स्वामी सेवा पोचणे गरजेचे : अण्णासाहेब मोरे; समर्थ सेवामार्ग गुरुपौर्णिमा उत्सवास प्रारंभ

वर्षभराची प्रक्रिया आवश्‍यक..

मृत सभासदांच्‍या वारसांना सभासद करण्यासाठी कार्यकारिणीची मंजुरी घेताना विशेष सभा बोलवावी लागेल. यामध्ये सभासदांची बहुमताने मंजुरी घेताना, त्‍यानंतर धर्मादाय आयुक्‍तांकडे तसा प्रस्‍ताव सादर करावा लागेल. ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी साधारणतः एक वर्षाचा कालावधी लागण्याची शक्‍यता असल्‍याचे जाणकारांचे म्‍हणणे आहे.

"यापूर्वी वेळोवेळी भूलथापा देताना मृत सभासदांच्‍या वारसांना सभासदत्‍व देण्याचा विषय रेंगाळत ठेवला. परंतु आम्ही निवडून आल्‍यास पहिलीच सभा घेताना यासंदर्भात निर्णय घेऊन आवश्‍यक ती कार्यवाही पूर्ण करणार असल्‍याची घोषणा आम्‍ही प्रचारात केली आहे." - ॲड. तानाजी जायभावे, प्रगती पॅनल

"मृत सभासदांच्‍या वारसांना सभासदत्‍व देण्याबाबतची निम्‍मी प्रक्रिया यापूर्वीच पार पडलेली आहे. निवडणुकीत सभासदांनी संधी दिल्‍यास येत्‍या काळात सभासदत्‍वाचा विषय पूर्ण करणार आहोत." - पंढरीनाथ थोरे, क्रांतिवीर विकास पॅनल

V. N. Naik Institution Election
Nashik News : महिलांसह बाळाचे वाचविले प्राण! तपोवन एक्स्प्रेस निघतानाची घटना

"पॅनलमध्ये अनुभवी व युवा उमेदवारांचा समन्‍वय साधला असून, आगामी काळात संस्‍थेची जबाबदारी युवा सभासदांवर सोपविणे आवश्‍यक असेल. त्‍यामुळे निवडून आल्‍यास मृत सभासदांच्‍या वारसांना सभासदत्‍व देण्याबाबत दोन महिन्‍यांच्‍या आत निर्णय घेतला जाईल." - बाळासाहेब सानप, परिवर्तन पॅनल

"संस्‍थेचे अनेक सभासद वयोवृद्ध असून, त्‍यांना वॉकर किंवा काठीचा आधार घ्यावा लागत आहे. म्‍हणून थोरांचा वारसा असलेल्‍या संस्‍थेचे कामकाज पुढे सुरू ठेवण्यासाठी मृतांच्‍या वारसांना सभासदत्‍व देणे आवश्‍यक असून, याबाबत सभासदांपर्यंत पॅनलची भूमिका मांडत आहोत." - मनोज बुरकुले, नवऊर्जा पॅनल

V. N. Naik Institution Election
Nashik News : जिल्ह्यातील कामचुकार ‘बीएलओं’ना नोटीस!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.