वणी : आदिशक्ती, आदिमाया स्वयंभू शक्तिपीठ सप्तशृंगगडावर कोजागरी पौर्णिमा उत्सव व कावड यात्रेत सामान्य भाविकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेल्या तृतीयपंथीयांच्या छबिन्याची मिरवणूक बुधवारी (ता. १६) उत्साहात पार पडली. ‘हे अंबे, हे भगवती या भूतलावरील सर्व मानव-प्राणिमात्रांवरील संकट निवारण करून सर्वांना सुखी ठेव, त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ दे...’ अशी प्रार्थना करीत अनेक तृतीयपंथीय श्री भगवतीचरणी लीन झाले. (procession of image of third party which is center of attraction for devotees took place with enthusiasm )