नाशिक : शहरात ऑप्टिकल फायबर केबल टाकण्याबरोबरच महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीकडून घरोघरी स्वयंपाकाचा गॅस पोचविण्यासाठी पाइपलाइन टाकली जात आहे. परंतु नागरिकांच्या असंख्य तक्रारींच्या अनुषंगाने खोदकाम करण्यासाठी रीतसर पत्र सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानुसार खोदकाम झालेल्या कामांचा अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच डांबरीकरण झालेल्या कामांच्या ठिकाणी खोदकामास मनाई करण्यात आली आहे.