Nashik Tourist Places : वर्षाविहार करताना मस्ती कराल तर याद राखा! पर्यटनस्थळे, धरणांसाठी प्रतिबंधात्मक आदेश जारी

Nashik News : पावसाळ्यामुळे विविध पर्यटनस्थळे आणि धरणांवरचे सौंदर्य खुलले आहे. या मनमोहक सौंदर्याचा आनंद घेताना अनेक पर्यटक मस्ती करतात. नियम धाब्यावर बसवतात.
Nashik Tourist Places
Nashik Tourist Places esakal

Nashik News : पावसाळ्यामुळे विविध पर्यटनस्थळे आणि धरणांवरचे सौंदर्य खुलले आहे. या मनमोहक सौंदर्याचा आनंद घेताना अनेक पर्यटक मस्ती करतात. नियम धाब्यावर बसवतात. परिणामी, जीव धोक्यात सापडत असल्याच्या घटना घडत आहेत. या पार्श्‍वभूमीवर पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी जिल्ह्यातील तब्बल ३५ पर्यटन स्थळांसाठी प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे. (Prohibitory orders issued for 35 tourist spots and dams in district)

यामुळे पर्यटनस्थळावर वर्षाविहारासाठी जाताना पर्यटकांना अनेक नियम पाळून खबरदारी घ्यावी लागणार आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये इगतपुरी, घोटी, वाडीवऱ्हे, त्र्यंबकेश्‍वर, हरसूल, पेठ, सुरगाणा, नांदुरीगड, कळवण, हरणबारी, मांगीतुंगी, निफाड या परिसरात पावसामुळे बऱ्याच ठिकाणी धबधबे तयार झालेले आहेत. विशेषतः भावली वैतरणा, मुकणे.

वालदेवी, दारणा, गंगापूर, कश्यपी, नांदुरमध्यमेश्‍वर, चणकापूर, हरणबारी धरण व गिरणाडॅम परिसरात मोठ्या प्रमाणात नागरीक वर्षाविहार पर्यटनासाठी येतात. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी पर्यटनासाठी तर मुंबई, ठाणे, नाशिक व महाराष्ट्रातील विविध ठिकाणांहून पर्यटक येतात. त्यामुळे या परिसरात पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होऊन वाहतूक कोंडी होते.

तसेच, रात्रीच्या वेळी पर्यटन स्थळांची माहिती नसल्याने पर्यटक भरकटण्याची घटना घडू शकते. त्यामुळे पर्यटकांची सुरक्षा अबाधीत राहण्यासाठी उपाययोजना करीत ग्रामीण भागामध्ये वर्षाविहार, पर्यटन करण्यास प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. (latest marathi news)

Nashik Tourist Places
Nashik Railway : सलग दुसऱ्या दिवशी ‘पंचवटी’सह अनेक गाड्या रद्द! नाशिकच्या प्रवाशांचे हाल

धरण क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गात वाढ होत असते. त्यामुळे अचानक पाण्यात पर्यटक अडकल्याने व वाहून गेल्याने मृत्यू होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. यावर देखील नागरीकांच्या दृष्टीकोनातून ३१ जुलैपर्यत प्रतिबंध घालण्यात आला आहे.

हे नियम पाळावे लागतील

पोलिसांच्या या आदेशामुळे आता पर्यटनस्थळे व धरणांवर पाचपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येता येणार नाही. पावसामुळे वाहणाऱ्या पाण्यात उतरणे, पोहणे, धबधब्यावर जाणे, प्रवाहाखाली बसण्याला बंदी असेल. धोकादायक झालेले धबधबे, दऱ्यांचे कठडे, धोकादायक वळणावर सेल्फी काढण्यास, चित्रीकरण करणे, नैसर्गिक धबधब्यांच्या परिसरामध्ये मद्यपान करणे, मद्य बाळगणे, उघड्यावर मद्यसेवन, वाहतुकीचे रस्ते तसेच धोकादायक ठिकाणी वाहने थांबवणे, बेदरकारपणे वाहन चालविणे.

धोकादायक स्थितीत ओव्हरटेक करणे, खाद्यपदार्थ, कचरा, काचेच्या व प्लॅस्टीकच्या बाटल्या, थरर्माकॉलचे व प्लॅस्टिकचे साहित्य उघड्यावर व इतरत्र फेकणे, महिलांची छेडछाड, टिंगलटवाळी, शेरेबाजी, गाणे-डिजे सिस्टम वाजविण्याला बंदी घालण्यात आली आहे. धबधब्याच्या १ किलोमीटर परिसरात सर्व दुचाकी, तीनचाकी, चारचाकी व सहाचाकी वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे.

Nashik Tourist Places
Nashik Bus Accident : बस दरीत कोसळून 2 मुलांचा मृत्यू! सापुतारा घाटात अपघात; जखमींना रुग्णालयात हलवले

ही स्थळे प्रतिबंधीत

इगतपुरी : भावली, भाम, ट्रिंगलवाडी, वैतरणा, मुकणे, वालदेवी, वाकी, दारणा धरण व पाण्याचे धबधबे. ट्रिंगलवाडी किल्ला, कसारा घाट परिसर.

त्र्यंबकेश्‍वर : भेजे डॅम, गंगापूर बॅक वाटर, अंबोली डॅम, कश्यपी व वायघोळ धरण, हरिहर किल्ला, अंजनेरी, ब्रह्मगिरी, खैऱ्यापाली किल्ला परिसर.

सुरगाणा : हतगड किल्ला, भिवतास धबधबा, सातुपरा रोड परिसर

कळवण : चणकापूर धरण, नांदुरीगड परिसर

सटाणा : हरणबारी धरण, साल्हेर-मुल्हेर किल्ला, मांगीतुंगी किल्ला परिसर

निफाड : नांदुरमध्यमेश्‍वर धरण, नांदुरमध्यमेश्‍वर अभयारण्य परिसर

येवला : अनकाई किल्ला परिसर

मालेगाव : गाळणा किल्ला परिसर

नांदगाव : गिरणा डॅम धरण

Nashik Tourist Places
Nashik News : आयुक्तालयातील प्रभारींवर ‘खांदेपालटा’ची टांगती तलवार; सहायक आयुक्तांमध्ये फेरबदलाची चर्चा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com