Nashik News : गोल्फ या क्रीडा प्रकाराचा नाशिकमध्ये प्रचार व प्रसार होण्यासाठी भारतीय गोल्फ महासंघ (आयजीयू)चे अध्यक्ष ब्रिजेंदर सिंग व शिष्टमंडळाने नाशिकला शुक्रवारी (ता. १४) भेट दिली. या वेळी झालेल्या बैठकीत नाशिकमध्ये गोल्फ खेळाच्या प्रचार व प्रसाराबाबत धोरणात्मक चर्चा करण्यात आली. (Promotion and dissemination of Golf sport in Nashik)
रिव्हर साइड गोल्फ कोर्सचे संचालक तथा गोल्फ असोसिएशन नाशिकचे अध्यक्ष विंग कमांडर (निवृत्त) प्रदीप बागमार, रिव्हर साइड गोल्फ कोर्सचे सचिव तथा जिल्हा संघटनेचे सचिव नितीन हिंगमिरे, तसेच पदाधिकारी गोल्फ खेळाच्या प्रसारासाठी प्रयत्न करीत असतात. त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. नाशिक भेटीदरम्यान सिंग यांच्याबरोबर ‘आयजीयू’चे महानिर्देशक मेजर जनरल (निवृत्त) भूषण.
खजिनदार संजीव रतन, पश्चिम क्षेत्राचे शशांक सांडू, संचालक तुषार मल्होत्रा उपस्थित होते. प्रारंभी इंडियन रेल्वे इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग तथा इरीन येथे रिव्हर साइड गोल्ड कोर्समार्फत चालविण्यात येणाऱ्या ड्रायव्हिंग रेंजची पाहणी व ‘इरिन’तर्फे नव्याने विकसित होणाऱ्या गोल्फ कोर्सची माहिती सभासदांनी घेतली.
या वेळी इंडियन रेल्वे इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे महानिर्देशक राहुल गौतम यांनी नव्याने विकसित होणाऱ्या गोल्फ कोर्सची माहिती दिली. तसेच, तांत्रिकदृष्ट्या मदत करण्याबाबत विचारणा केली. (latest marathi news)
या वेळी झालेल्या चर्चेनंतर भारतीय गोल्फ महासंघ त्यांच्याबरोबर तांत्रिक सहकार्याचा करार करण्यास इच्छुक असल्याची माहिती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजेंदर सिंग यांनी दिली. बैठकीस ‘इरीन’तर्फे महानिर्देशक राहुल गौतम, प्राचार्य हुकूमसिंग यांसह रिव्हरसाइड गोल्फचे स्क्वाड्रन लीडर (निवृत्त) राकेश वहाळ हेही उपस्थित होते.
भेटीनंतर निफाड येथील रिव्हर साइड गोल्फ कोर्स येथे बैठक घेण्यात आली. बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. नाशिकमध्ये गोल्फ खेळासाठी लागणाऱ्या गोल्फ कोर्स मैदानाकरिता लागणारी विशिष्ट प्रकारची मशिनरी, मुलांना शिकविण्यासाठी तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेतलेले प्रशिक्षक, शालेय स्तरावर स्पर्धांचे आयोजन, महाराष्ट्रातील खेळाडूंसाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन, त्यास लागणारे साहित्य आणि निवास व भोजन व्यवस्था आदींबाबत चर्चा करण्यात आली.
खेळाडूंच्या अडचणी, स्पर्धा आयोजनासाठी लागणारे मार्गदर्शन व प्रायोजक यासंदर्भात प्रदीप बागमार यांनी माहिती दिली. नितीन हिंगमिरे यांनी जिल्हा व राज्यस्तरावर लीग स्पर्धांचे आयोजन करण्याबाबत सुचविले. सर्व प्रकारच्या अडचणी समजून घेऊन महासंघ म्हणून निश्चित मदत करणार असल्याची ग्वाही सिंग यांनी दिली.
ऐंशी वर्षांपुढील खेळाडूंना मोफत खेळता येणार
देशभरातील ८० वर्षांपुढील खेळाडूंना यापुढे भारतातील गोल्फ महासंघाशी संलग्न गोल्फ कोर्सवर मोफत खेळण्याची मुभा असेल, अशी महत्त्वाची घोषणा सिंग यांनी केली. रिव्हर साइड गोल्फ कोर्सचे सभासद ८२ वर्षीय रमेश सप्रे यांचा सत्कार या वेळी करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.