Nashik Police Promotion : शहर आयुक्तालयात ‘श्रेणी उपनिरीक्षक’ पदी बढती! प्रभारी निरीक्षकांच्याही खांदेपालटाची चर्चा

Nashik News : आयुक्तालय हद्दीतील तीन सहायक उपनिरीक्षकांना ‘श्रेणी उपनिरीक्षक’ पदी बढती देण्यात आली असून, ३५ हवालदारांना सहायक उपनिरीक्षक आणि ४० पोलिस नाईक पदावरील अंमलदारांना हवालदारपदी पदोन्नती देण्यात आली आहे.
Police Promotion
Police Promotionesakal
Updated on

Nashik Police Promotion : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपताच, शहर पोलीस आयुक्तालयात पदोन्नती आणि बदल्यांचे वारे वाहू लागले आहेत. त्यानुसार, आयुक्तालय हद्दीतील तीन सहायक उपनिरीक्षकांना ‘श्रेणी उपनिरीक्षक’ पदी बढती देण्यात आली असून, ३५ हवालदारांना सहायक उपनिरीक्षक आणि ४० पोलिस नाईक पदावरील अंमलदारांना हवालदारपदी पदोन्नती देण्यात आली आहे.

यामुळे पोलीस अंमलदारांमध्ये आनंदाचे वातावरण असतानाच, आयुक्तालय हद्दीतील काही पोलीस ठाण्यांच्या प्रभारींच्याही बदल्या होणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे कोणाची वर्णी लागते, अन्‌ कोणाची उचलबांगडी होते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. (Nashik Promotion to post of Grade Sub Inspector in City Commissionerate)

पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी शहर आयुक्तालय हद्दीतील पोलिस अंमलदारांच्या पदोन्नतीचे आदेश जारी केले आहेत. त्यानुसार पोलिस सेवेत ३० वर्षे कार्यकाळ पूर्ण केलेले आणि सहायक पोलिस उपनिरीक्षक पदी तीन वर्षे कर्तव्य बजाविलेल्या तिघांना ‘श्रेणी उपनिरीक्षक’ पदी पदोन्नती देण्यात आली आहे. यात, पोलिस मुख्यालयातील अनिवाश कालिदास झोपे, शहर वाहतूक शाखेतील साहेबराव रामदास गवळी आणि अशोक बबनराव तांबे यांचा समावेश आहे.

याचप्रमाणे, ३५ हवालदारांना सहायक पोलिस निरीक्षकपदी बढती देण्यात आलेली आहे. यात, मोटर परिवहन विभाग, शहर वाहतूक शाखा, मुख्यालय, नागरी हक्क संरक्षण, विशेष शाखा यासह पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर ४० पोलिस नाईक पदावरील कर्मचाऱ्यांची हवालदार पदी पदोन्नती देण्यात आली आहे. (latest marathi news)

Police Promotion
Police Transfers by Promotion : राज्यातील 449 सहायक निरीक्षकांच्या पदोन्नतीने बदल्या!

खांदेपालटाची चर्चा

दरम्यान, निवडणुकीपूर्वी नव्याने काही अधिकारी शहर आयुक्तालयात दाखल झालेले आहेत. असमाधानकारक कामगिरीमुळे काही पोलीस ठाण्याच्या प्रभारी पोलिस निरीक्षकांच्या बदल्या होणार असल्याची चर्चा पोलीस वर्तुळात सुरू आहेत. त्यामुळे कोणत्या पोलिस ठाण्यांच्या ‘प्रभारीं’ची उचलबांगडी होते अन्‌, कोणाची वर्णी लागते याकडे आयुक्तालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचे लक्ष लागून आहे. तर काही अंमलदारांनाही बदली पाहिजे आहे. त्यासाठी त्यांचे अर्जदेखील मुख्यालयाकडे प्राप्त झालेले आहेत. त्यामुळे आयुक्तालयातील बदल्यांचे वारे आणखी काही दिवस राहतील अशी चर्चा आहे.

Police Promotion
मोठी बातमी! आषाढी एकादशीसाठी वारकऱ्यांसाठी थेट गावातून पंढरपूरपर्यंत बस, पण ‘ही’ आहे अट; महामंडळाकडून यंदा ५००० बसगाड्यांची सोय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.