Nashik Fake Proof Officers : लोकसेवा आयोगातील तथाकथिक पूजा खेडकरच्या खोट्या दिव्यांग प्रमाणपत्राची पुनर्रावृत्ती महाराष्ट्राच्या राज्यसेवेच्या परीक्षेत झाल्याचे आता उघड झाले आहे. २०२२ च्या राज्यसेवेच्या निकालात बनावट दिव्यांग प्रमाणपत्र सादर करीत तहसिलदार पदी नियुक्ती मिळविलेल्या बाळू दिगंबर मरकड याने मूळचा सोलापूरचा असताना नाशिक जिल्ह्यातील खोटा रहिवासी पुरावा म्हणून बनावट आधारकार्ड सादर केल्याचे समोर आले आहे. याप्रमाणेच आक्षेप असलेल्या राज्यभरातील आठ जणांचेही अहवाल अद्याप प्रलंबित असून याविरोधात राज्यसेवा समिती काय भूमिका घेते याकडे राज्याचे लक्ष लागून आहे. (Nashik proofs given by tehsildar balu Markad also fake)
तथाकथित पूजा खेडकर प्रमाणेच, खोटे दिव्यांग प्रमाणपत्र सादर करीत राज्यसेवेच्या परीक्षेच्या माध्यमातून सरकारी नोकरी पदरात पाडून घेणाऱ्या बाळू मरकड याने त्यासाठी केलेले एक-एक प्रताप उघड होत आहे. राज्यसेवा आयोगाला सादर केलेले दिव्यांग प्रमाणपत्र बाळू मरकड याने नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातून मिळविले आहे.
त्यासाठी त्याने नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील मनमान येथील खोटा पत्ता दिला आहे. त्याचप्रमाणे, पुराव्यासाठी खोटा पत्ता असलेले बनावट आधारकार्ड तयार केले होते. या साऱ्या खोट्या पुराव्यांच्या आधारे त्याने नाशिक जिल्हा रुग्णालयातून दिव्यांग प्रमाणपत्र मिळविले.
एवढेच नव्हे, तर दृष्टीदोष व बहिरेपणाचे प्रमाण हे २० टक्क्यांपेक्षाही कमी असताना त्याने राज्यसेवा आयोगाला दिलेल्या दिव्यांग प्रमाणपत्रामध्ये ४७ टक्के दाखविले आहे. २०२२ च्या राज्यसेवेच्या निकालानंतर त्याची नियुक्ती तहसिलदार पदी करण्यात आली. परंतु त्यानंतर त्यास पुन्हा वैदयकीय चाचणीसाठी सांगण्यात आले. परंतु त्याने चाचणीसाठी टाळाटाळ केल्याचेही आता समोर येते आहे. या साऱ्या प्रकारामुळे बाळू मरकड याच्यासमोरील अडचणीत भर पडली आहे. (latest marathi news)
२०२१ पूर्वी अन् २०२१ नंतर...
सांगोला (जि. सोलापूर) तालुक्यातील लोणविरे ग्रामपंचायतीत ग्रामसेवक असलेल्या बाळू दिगंबर मरकड याने २०२१ पूर्वी राज्य सेवेची परीक्षा दिली. त्यावेळी त्याने सिंगल डिसॲबेलिटी प्रकारातून परीक्षा दिली होती. त्यानंतरची परीक्षा मरकड याने मल्टीपल डिसॲबेलिटी प्रकारात दिली. त्यासाठी त्याने बहिरेपणासह दृष्टिदोष असे मल्टिपल डिसॲबेलिटी (बहुविकलांग) दिव्यांग प्रमाणपत्र मिळवून परीक्षा दिली. हीच बाब जाणकारांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यासंदर्भात तक्रारी करण्यात आल्या आहेत.
असा होता खोटा पत्ता
नाशिक जिल्हा रुग्णालयाकडे दिव्यांग प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज करताना बाळू मरकड याने ‘जोगेश्वर बंगला, कॉलेजरोड, मनमाड, ता. नांदगाव, जि. नाशिक’ असा बनावट पत्ता असलेले आधारकार्ड दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.