SPPU News : महाविद्यालय बंदसाठी मागविले प्रस्‍ताव! पुणे विद्यापीठातर्फे 1 ऑगस्‍टपर्यंत मुदत

Nashik News : महाविद्यालय, विद्याशाखा टप्प्‍याटप्प्‍याने बंद करणे, विद्यार्थिसंख्या घटविण्यास इच्‍छुक असलेल्‍या महाविद्यालयांकडून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने प्रस्‍ताव मागविले आहेत.
SPPU News
SPPU News esakal
Updated on

Nashik News : महाविद्यालय, विद्याशाखा टप्प्‍याटप्प्‍याने बंद करणे, विद्यार्थिसंख्या घटविण्यास इच्‍छुक असलेल्‍या महाविद्यालयांकडून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने प्रस्‍ताव मागविले आहेत. या संदर्भात १ ऑगस्‍टपर्यंत मुदत दिलेली आहे. प्राप्त अर्जांच्‍या छाननीनंतर शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून प्रत्‍यक्ष कार्यवाही केली जाईल. (proposal called for college closure Deadline till 1st August by Pune University)

या संदर्भात पुणे विद्यापीठातर्फे सूचनापत्र जाहीर केले आहे. यात नमूद केल्‍यानुसार शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून संलग्‍नित टप्प्‍याटप्प्‍याने बंद करणे किंवा विद्यार्थिसंख्येत घट करण्याबाबतचे प्रस्‍ताव महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियमानुसार संधी उपलब्‍ध करून दिली आहे. या प्रक्रियेंतर्गत १ ऑगस्‍ट किंवा त्‍यापूर्वी प्रस्‍ताव सादर करणे बंधनकारक आहे.

हे प्रस्‍ताव ऑनलाइन पद्धतीने भरायचे असून, त्‍यासाठी संकेतस्‍थळाला भेट देण्याचे आवाहन केले आहे. ऑनलाइन पद्धतीने सादर प्रस्‍तावाची प्रिंट काढून या प्रस्‍तावाची प्रत संस्‍थेचे अध्यक्ष, सचिव यांच्‍यामार्फत १ ऑगस्‍ट किंवा त्‍यापूर्वी विद्यापीठ शैक्षणिक विभागात सादर करण्याच्‍या सूचना दिल्‍या आहेत. (latest marathi news)

SPPU News
Nashik Family Court : नाशिकला हवे आणखी एक कौटुंबिक न्यायालय! नाशिक बार कौन्सिलची उच्च न्यायालयाकडे मागणी

बऱ्याच वेळा विविध कारणांनी महाविद्यालयांकडून विद्याशाखा बंद करणे, विद्यार्थिसंख्या घटविण्याची परिस्‍थिती उद्‍भ‌वत असते. या पार्श्वभूमीवर महाविद्यालयांना संधी उपलब्‍ध करून देण्याच्‍या अनुषंगाने पुणे विद्यापीठातर्फे ही प्रक्रिया राबविली जात आहे.

यासाठी सादर करता येणार प्रस्‍ताव

महाविद्यालये, मान्‍यताप्राप्त परिसंस्‍था, संशोधन संस्‍था, विद्याशाखा, अभ्यासक्रम, संशोधन अभ्यासक्रम (एम.फिल/पीएच.डी.) आदी टप्प्‍याटप्प्‍याने बंद करण्यासंदर्भात प्रस्‍ताव सादर करण्यास सांगितले आहे. तसेच विद्यार्थिसंख्येत घट करण्यासाठी प्रस्‍ताव सादर करता येणार आहे.

SPPU News
Nashik Parking Problem : फुटपाथ पादचाऱ्यांसाठी की पार्किंगसाठी? पादचारी रस्त्यावर; कारवाईच्या धाकाने फुटपाथवर पार्किंग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.