Nashik ZP News : जिल्हा परिषदेच्या गलथान कारभाराचा ‘निर्मल वारी’ला फटका; साडेपाच कोटींचा प्रस्ताव रद्द होण्याची शक्यता

Nashik News : जिल्ह्यातील वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या संत निवृत्तिनाथ पालखी सोहळ्यासाठी जिल्हा परिषदेने तयार केलेला साडेपाच कोटींचा प्रस्ताव ‘पाण्यात’ जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Nashik ZP News
Nashik ZP News esakal
Updated on

Nashik News : जिल्ह्यातील वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या संत निवृत्तिनाथ पालखी सोहळ्यासाठी जिल्हा परिषदेने तयार केलेला साडेपाच कोटींचा प्रस्ताव ‘पाण्यात’ जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्हा परिषदेने सहा महिने उशिराने हा प्रस्ताव तयार केला. आता दहा दिवसांनी वारी पंढरपूरकडे प्रस्थान होत असताना ऐनवेळी होणारी कसरत थांबवण्यासाठी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी जिल्हा नियोजन समितीतून ५० लाख रुपये देण्याचे आश्‍वासन विश्‍वस्त मंडळाला दिले आहे. (Nashik ZP News)

संत ज्ञानेश्वर माउली व संत तुकोबाराय यांच्या पालखी सोहळ्याप्रमाणेच संत सोपानदेव, संत निवृत्तिनाथ व संत मुक्ताई यांच्या पालखीतील वारकऱ्यांना मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी ‘निर्मल वारी’ची घोषणा राज्य सरकारने केली. त्यासाठी एकत्रितपणे २० कोटींचा निधी देण्याची घोषणा २०२३ च्या अर्थसंकल्पात तत्कालीन अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.

त्यानुसार ग्रामविकास मंत्रालयाने या घोषणेप्रमाणे निधी देण्यासाठी जुलैमध्ये पहिले पत्र जिल्हा परिषदेला पाठवत निर्मल वारीचा प्रस्तावही मागवला. मात्र, सहा महिने उलटूनही या पत्राची साधी दखलही त्यांनी घेतली नाही. त्यानंतर ग्रामविकास मंत्रालयाने जिल्हा परिषदेला २९ एप्रिलला पुन्हा स्मरणपत्र पाठवले. त्यानंतर निर्मल वारीचा सहा कोटी ५० लाखांचा प्रस्ताव तयार करून गेल्या आठवड्यात तो प्रस्ताव मंत्रालयात पाठवण्यात आला.

आता दहा दिवसांनी त्र्यंबकेश्‍वर येथून निर्मल वारीचे प्रस्थान होत असताना प्रस्तावास मंजुरी मिळण्याची शक्यता धूसर आहे. अगोदरच उशीर झालेला, त्यात आता अगदी बोटावर मोजण्याएवढे दिवस शिल्लक राहिल्याने त्यावर तोडगा काढण्यासाठी सोमवारी (ता. १०) सायंकाळी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. (latest marathi news)

Nashik ZP News
Nashik News : कैरी खरेदीसाठी बाजारात वर्दळ; पावसाच्या आगमनाने गृहिणींची लगबग

या वेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्यासह संत निवृत्तिनाथ महाराज समाधी मंदिराच्या अध्यक्षा कांचन जगताप, सचिव अमर ठोंबरे, विश्‍वस्त ॲड. सोमनाथ घोटेकर, माजी अध्यक्ष नीलेश गाढवे, सोहळाप्रमुख नारायण मुठाळ यांसह अधिकारी उपस्थित होते. त्र्यंबकेश्‍वर ते पंढरपूरपर्यंत २८ दिवसांसाठी नियोजन करताना फिरते शौचालये, पावसाळ्याच्या दृष्टीने वॉटरप्रूफ मंडप, साउंड सिस्टिम.

सीसीटीव्ही आदींचा समावेश असलेला पाच कोटी ६८ लाख ६५ हजारांचा नवा प्रस्ताव शासनाला पाठविण्यात आला आहे. प्रस्तावास मंजुरी मिळाली नाही, तर जिल्ह्याची नामुष्की होऊन निधी परत जाऊ शकतो. त्यावर उपाय म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून ५० लाखांची तरतूद करण्याचे आश्‍वासन दिले. मात्र, निर्मल वारीच्या निधीवरून भविष्यात ‘रामायण’ घडण्याची शक्यता आहे.

असा आहे आराखडा

जिल्हा परिेषदेने तयार केलेल्या पाच कोटी ६८ लाखांच्या निर्मल वारीच्या प्रस्तावात वारीतील भाविकांना मुक्कामाच्या ठिकाणी जलप्रतिबंधक मंडपासाठी ७५ लाख रुपये, गोलमंडपासाठी दहा लाख रुपये, साउंड सिस्टिम, जनरेटर लाइट व्यवस्था १४ लाख रुपये, पाण्याचे टॅंकर नऊ लाख ३६ हजार.

Nashik ZP News
Nashik ZP News : जिल्हा परिषदेच्या ‘सुपर फिफ्टी’तील 7 विद्यार्थी जेईई ॲडव्हान्स्ड परीक्षा उत्तीर्ण

फिरते शौचालये दोन कोटी ६३ लाख रुपये, फिरते स्थानगृह एक कोटी एक लाख रुपये, रुग्णवाहिका ३५ लाख रुपये, सीसीटीव्ही दोन कोटी ८० लाख रुपये, पशुधन खर्च ४७ लाख रुपये, पालखी सोहळ्यातील भाविकांना सुविधा देण्यासाठी स्थानिक ग्रामपंचायतींना १३ लाखांचा निधी देण्याचा प्रस्ताव आहे.

"निर्मल वारीचा प्रस्ताव नामंजूर झाल्यास ऐनवेळी मदत म्हणून गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही जिल्हा नियोजन समितीतून निधी देण्याची आमची तयारी आहे. गेल्या वर्षी ४० लाख रुपये दिले होते. यंदा त्यात दहा लाखांची वाढ करण्यात येईल." - जलज शर्मा, जिल्हाधिकारी, नाशिक

"निर्मल वारीचा प्रस्ताव तयार करताना अनावश्‍यक बाबींवर जास्त खर्च प्रस्तावित केला होता. तसेच संपूर्ण २८ दिवसांचा आम्ही आराखडा तयार करून दिला. त्यामुळे आराखड्यात बदल सुचवला. प्रशासनाने याची तयारी अगोदरपासून करायला हवी होती. यात वारकऱ्यांचे नुकसान झाले." - कांचन जगताप, अध्यक्ष, संत निवृत्तीनाथ महाराज समाधी मंदिर, त्र्यंबकेश्‍वर

Nashik ZP News
Nashik ZP News : ग्रामसेवकांच्या आंदोलनाबाबत जिल्हा परिषद प्रशासन अंधारात; आज होणाऱ्या बैठकीकडे ग्रामसेवकांचे लक्ष

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.