Nashik News : नासर्डी पुलावरील संरक्षक कठडा गायब! हजारो प्रवाशांचा जीव मुठीत घेऊन प्रवास

Nashik News : नंदिनी नदीवरील नासर्डी पुलास संरक्षक कठडा नसल्यामुळे या नाशिक- पुणे महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांसाठी हा एकप्रकारे मृत्यूचा सापळाच तयार झाला आहे.
The missing guardrail on the Nasardi bridge.
The missing guardrail on the Nasardi bridge.esakal
Updated on

नाशिक : नंदिनी नदीवरील नासर्डी पुलास संरक्षक कठडा नसल्यामुळे या नाशिक- पुणे महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांसाठी हा एकप्रकारे मृत्यूचा सापळाच तयार झाला आहे. नाशिक रोडवरून द्वारका सर्कल व शहराकडे जाताना उजव्या हाताला नासर्डी पुलावरील संरक्षक कठडा नसल्यामुळे त्यावरून प्रवास करणारे वाहने थेट नदीत कोसळून मोठा अपघात घडण्यासाठी एक प्रकारे आमंत्रणच दिले जात आहे.

याच ठिकाणी काही दिवसापूर्वी एक वाहन कठडा नसल्यामुळे नदीमध्ये कोसळले होते. याबद्दल माहिती असतानाही प्रशासनाकडून कुठलीही उपाययोजना केली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. (Nashik protective side wall on Nasardi bridge missing marathi news)

या महामार्गावरून हजारोंच्या संख्येने रोज वाहने प्रवास करतात. नाशिक रोड मार्गे द्वारका व मुंबई नाका येथे जाताना शहरात जाण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे. शहरातील वाहतुकीच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचे द्वारका सर्कल आहे. ते या पुलापासून अवघे एक ते दीड किलोमीटर अंतरावर आहे.

तसेच शिर्डी व पुणे यासह अनेक जिल्ह्यात जाण्यासाठी हाच मार्ग वापरला जातो. छोट्या व मोठी अवजड वाहने, स्कूल बस, नोकरदार, कामगार हे सर्व याच रस्त्यावरून प्रवास करतात. दुर्दैवाने जर वाहन खाली कोसळले तर जवळपास शंभर फूट खोल नदीत कोसळून जीवितहानी होऊ शकते.

द्वारका- नाशिक रोड रस्त्यावर नियमित महामार्ग(एनएचएआय) नाशिक महापालिकेकडून दुरुस्ती व देखभाली काम नियमितपणे सुरूच असते. पण एवढ्या मोठ्या व गंभीर बाबीकडे कुठल्याही अधिकाऱ्यांचे लक्ष गेले नाही, याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. (Latest Marathi News)

The missing guardrail on the Nasardi bridge.
Chitra Wagh : उद्धव ठाकरेंच्या 'क्लीनचीट'मुळेच संजय राठोड मंत्री; संतप्त होत चित्रा वाघ यांनी स्पष्ट केली भूमिका

"महत्त्वाच्या रस्त्यावरील पुलावर कठडा नसणे हे अत्यंत नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने गंभीर आहे. प्रशासनाने त्वरित संरक्षक कठडा बसवावा. यामुळे मोठा अपघात व जीवितहानी टाळू शकेल तसेच शहरातील इतर काही ठिकाणीही अशी काही गंभीर समस्या आहे का, याबाबतही निरीक्षणे करावीत."- डॉ. श्याम पाटील, संचालक, सुविचार हॉस्पिटल

"नाशिक शहरामध्ये कामगार वर्गांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. बहुतांशी परप्रांतीय आहे. कामानिमित्त ते याच रस्त्यावरून प्रवास करतात. कठडा नसल्यामुळे मोठी घटना घडू शकते. प्रशासनाने त्वरित याबद्दल पावले उचलावीत."- मुकेश तिवारी, रहिवासी, आंबेडकरनगर

The missing guardrail on the Nasardi bridge.
Nashik News : अखेर 'त्या' अपघातप्रवण रस्त्यावर बसविले हम्प

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.