Nashik News : गोदावरी प्रदुषण मुक्त करण्यासाठी जनजागृती! धर्मप्रमुख, गुरूंना पुढाकार घेण्याचे आवाहन

Nashik News : गोदावरी नदीत तयार होणाऱ्या पानवेली हटविण्यासाठी केमिकलचा मारा केला जाणार असून त्यापूर्वी निरी चे मत घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
Officials participating in the Anti-Godavari Sewerage Forum meeting chaired by Divisional Commissioner Radhakrishna Game.
Officials participating in the Anti-Godavari Sewerage Forum meeting chaired by Divisional Commissioner Radhakrishna Game.esakal
Updated on

नाशिक : गोदावरी पुरोहित संघ व रामतीर्थ समितीत गोदाआरती वरून वाद सुरु असताना गोदावरी प्रदूषण मुक्त बैठकीत प्रत्येक धर्मात नदीचे महत्त्व सांगितल्याने त्याअनुषंगाने गोदावरी प्रदूषण मुक्त करण्यासाठी सर्व धर्माच्या गुरू किंवा प्रमुखांनी जनजागृती करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन करण्यात आले. त्याचबरोबर गोदावरी नदीत तयार होणाऱ्या पानवेली हटविण्यासाठी केमिकलचा मारा केला जाणार असून त्यापूर्वी निरी चे मत घेण्याचा निर्णय घेण्यात आला. (Nashik Public awareness free Godavari pollution marathi news)

विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (ता. २२) उच्च न्यायालयाच्या समितीची तसेच गोदावरी गटारीकरण विरोधी मंचच्या सदस्यांची बैठक झाली. यात हे आवाहन करण्यात आले. बैठकीला जिल्हाधिकारी जलज शर्मा, महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, स्मार्ट सिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे, प्रदूषण मंडळाचे अमर दुर्गुळे, महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे, पोलिस निरीक्षक बगाडे, एमआयडीसीचे जयवंत बोरसे, गोदावरी गटारीकरण मंचचे निशिकांत पगारे आदी उपस्थित होते.

विविध विषयांवर चर्चा

श्री. गमे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत गोदावरी नदीतील सिमेंट क्रॉंक्रिटीकरण हटविण्याबाबत चर्चा झाली. नदीतील सिमेंट कॉंक्रीटीकरण हटविण्याच्या सूचना आहेत. परंतु तांत्रिक कारणामुळे हे हटविण्यास विलंब होत असल्याने तातडीने हे कॉंक्रीटीकरण हटविण्याच्या सूचना देण्यात आल्या.

तसेच सांडपाणी शुध्द केल्यानंतर ते नदीपात्रात सोडले जाते. तरीदेखील नदी पात्रात फेस दिसून येतो. त्यामुळे फेस निर्माण होण्याची कारणाचा शोध घेण्यासाठी उपाययोजना देखील ‘निरी’कडून मागितल्या जाणार आहे. गंगापूर भागात चिखली नाल्याला लागून सिमेंट कॉंक्रीटची भिंत बांधली जात आहे.

वास्तविक उच्च न्यायालयाने नदी जिवंत ठेवण्यासाठी गॅबियन वॉल बांधण्याच्या सूचना दिल्या आहेत. असे असतानाही महापालिकेने सिमेंट कॉंक्रीट भिंत बांधण्यास परवानगी दिल्याने त्यावर आक्षेप घेण्यात आला. सिमेंट भिंत हटविण्यासाठी महापालिका आयुक्तांना सूचना देण्यात आल्याचे विभागीय आयुक्तांकडून सांगण्यात आले. (Latest Marathi News)

Officials participating in the Anti-Godavari Sewerage Forum meeting chaired by Divisional Commissioner Radhakrishna Game.
SAKAL Follow Up: बस झालं... आता परीक्षार्थ्यांच्‍या अडचणी सुटाव्‍यात! वाचा फोडल्‍याबद्दल ‘सकाळ’चे कौतुक

पानवेली हटविण्यासाठी केमिकलचा मारा

गोदावरी नदी पात्रात दरवर्षी ठराविक कालावधी नंतर पानवेली साचतात. पानवेली हटविण्यासाठी करोडो रुपये खर्च केले जातात. दरवर्षी पानवेली हटविण्यासाठी विशेष आर्थिक तरतूद केली जाते. परंतु पानवेलींवर ठोस उपाययोजना होत नाही. महापालिकेने २०१२ मध्ये पानवेली हटविण्यासाठी दोन रोबोटिक यंत्रांची खरेदी देखील केली.

परंतु त्या यंत्राचा वापर झाला नाही. त्यामुळे आता केमिकलद्वारे पानवेली व बीज नष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला. ग्लाय फॉस्फेट केमिकलचा वापर करून पानवेली हटविली जाणार आहे. परंतु केमिकल वापरल्यामुळे नदीमधील जीवांच्या अस्तित्वाला धोका निर्माण होवू शकतो का यावर राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (निरी) या केंद्र सरकारच्या संस्थेकडून मत मागविण्याचा निर्णय घेण्यात आला.

धर्मगुरूंचा पुढाकार

प्रत्येक धर्मात नदीचे महत्त्व अधोरेखित केले आहे. त्यामुळे गोदावरी प्रदूषण मुक्त करण्यासाठी धर्मगुरुंनी जनजागृती करण्याची संकल्पना गोदावरी गटारीकरण विरोधी मंचचे निशिकांत पगारे यांनी मांडली. धर्मगुरु किंवा प्रत्येक धर्माच्या प्रमुखांनी पुढाकार घेऊन जनजागृती करण्याचे आवाहन करण्यात आले.

Officials participating in the Anti-Godavari Sewerage Forum meeting chaired by Divisional Commissioner Radhakrishna Game.
SAKAL Exclusive : अमली पदार्थांविरोधात शहर पोलिस ‘अलर्ट’! पोलिस आयुक्त आक्रमक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.