Nashik News : केळझर वाढीव चारीसाठी जनआक्रोश आंदोलन! आगामी विधानसभेवर बहिष्कार टाकण्याचा इशारा

Latest Nashik News : प्रशासकीय मंजुरी मिळाली नाही तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर १५ ऑक्टोबरपासून बहिष्कार टाकण्याचा निर्णय लाभक्षेत्रातील शेतकऱ्‍यांनी घेतला.
Farmers involved in protest.
Farmers involved in protest.esakal
Updated on

सटाणा : गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या केळझर चारी क्रमांक ८ च्या वाढीव चारीचे सर्वेक्षण झाले, मात्र प्रशासकीय मंजुरी मिळूनही काम सुरू होत नाही. त्यामुळे संतापलेल्या शेतकऱ्‍यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर आक्रोश आंदोलन केले. प्रशासकीय मंजुरी मिळाली नाही तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर १५ ऑक्टोबरपासून बहिष्कार टाकण्याचा निर्णय लाभक्षेत्रातील शेतकऱ्‍यांनी घेतला. (Public outcry for increased Kelzar Chari)

चौगाव (ता.बागलाण) येथे लाभक्षेत्रातील कौतिकपाडे, मुळाने, भाक्षी, चौगाव, अजमेर सौंदाणे, कऱ्‍हे, देवळाणे, सुराणे आदि गावातील शेतकऱ्‍यांनी एकत्र येत आक्रोश आंदोलन छेडले. यावेळी सार्वजनिक पाटबंधारे विभागाला दिलेल्या निवेदनात, झिरो ते वीस किलोमीटर सर्वेक्षण करण्यात यावे, गळतीच्या ठिकाणी काँक्रिटीकरण करण्यात यावे अशा मागण्या ठेवण्यात आल्या. तसेच योजनेतील जलवाहिनी निकृष्ट दर्जाची असून त्या जलवाहिनीचा पंचनामा करून संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणीही शेतकऱ्यांनी केली.

यावेळी माजी आमदार संजय चव्हाण यांनी आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी असून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मदत करण्याचे आश्वासनही दिले. जयश्री गरुड यांनीही हा सिंचनाचा प्रश्न समजून घेण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. यावेळी समितीचे राजेंद्र जाधव, सुधाकर पाटील, शेतकरी मात्र बिंदू शर्मा, नंदकिशोर शेवाळे, सरपंच सुशीला पवार, उपसरपंच दीपक शेवाळे, उत्तम शेवाळे, मोठाभाऊ शेवाळे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. (latest marathi news)

Farmers involved in protest.
गडहिंग्लज पंचायत समितीत तब्बल 23 लाखांचा अपहार; वरिष्ठ सहायक दयानंद पाटलांवर होणार कारवाई?

पंधरा दिवसात सर्वेक्षण

आंदोलनाची दखल घेत उपविभागीय अधिकारी श्री. खैरनार यांनी पंधरा दिवसाच्या आत सर्वेक्षण करण्याचे लेखी आश्वासन दिली. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांना पंधरा दिवसाची मुदत देऊन काम सुरू करण्याचे सांगितले. उपविभागीय अधिकारी क्षीरसागर यांनी वाढीव कामास नियोजन मंडळाची मान्यता मिळालेली असून लवकरच प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव दाखल करण्याचे सांगितले.

"आतापर्यंत सिंचनाचे प्रश्न मार्गी लावून काम प्रत्यक्षात सुरू केले आहे. वाढीव चारी क्रमांक आठसाठी नियामक मंडळाची मंजुरी घेतलेली आहे. जलसंपदा मंत्र्यांची भेट घेऊन प्रश्न मार्गी लावू."- डॉ. सुभाष भामरे, माजी खासदार, धुळे

"आमच्या गावात पाणी येईल या आशेने अनेक वर्षांपासून वाट बघूनही शेतकऱ्‍यांना पदरी नेहमी निराशा येते. शेतकऱ्यांचा प्रश्न सुटला नाही तर, सर्व गावे गावे निवडणुकीवर बहिष्कार टाकतील." - नंदकिशोर शेवाळे, अध्यक्ष, केळझर चारी क्रमांक

Farmers involved in protest.
Nashik Dengue Update : डेंग्यूचा विळखा होतोय घट्ट! सिन्नरला तेरा रूग्ण; साथीच्या रुग्णांनी दवाखाने फुल्ल, चिकणगुणियाचीही लागण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.