Nashik ZP News : जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागाच्या रखडलेल्या संगणक खरेदीला मुहूर्त लागला असून, सामान्य प्रशासनाने निविदा प्रक्रिया राबविल्यावर १५८ संगणकांची खरेदी केली आहे. खरेदी केलेल्या या संगणक, प्रिंटर व यूपीएसचे मुख्यालयासह १५ पंचायत समित्यांमध्ये मंगळवारी (ता. १६) वाटप करण्यात आले. सर्व विभागांना संगणक देण्याचा प्रयत्न केल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी सांगितले. (Nashik Purchase of 157 computers from Zilla Parishad)
जिल्हा परिषदेच्या २०२२-२३ च्या अंदाजपत्रकात सामान्य प्रशासन विभागाला संगणक खरेदीसाठी एक कोटी रुपयांची तरतूद केली होती. गेल्या वर्षी त्या निधीतून संगणक खरेदी करताना जीईएम पोर्टलवर विशिष्ट ठेकेदारास डोळ्यांसमोर स्पेशिफिकेशन ठरविणे, आधीच्या खरेदीपेक्षा दहा टक्क्यांपेक्षा अधिक दराने खरेदी करणे, खरेदी समितीची बैठक न घेणे, वित्त विभागाला टाळून जीईएम पोर्टलवर खरेदी प्रक्रिया टाळणे आदी कारणांमुळे ती खरेदी प्रक्रिया वादात सापडली होती.
यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ती प्रक्रिया रद्द करीत या खरेदीचे फेरनिविदा राबविण्याचे आदेश दिले होते. मात्र, सामान्य प्रशासन विभागाने त्या आर्थिक वर्षात फेरनिविदा राबवली नाही. यंदाच्या वर्षाच्या अंदाजपत्रकात संगणक खरेदीसाठी १.३५ कोटी रुपयांची तरतूद केली. त्यापैकी १.३० कोटी रुपयांचे संगणक खरेदी केले जाणार असून, उर्वरित पाच लाख रुपये देखभाल दुरुस्तीसाठी खर्च करण्यासाठी आहेत.(latest marathi news)
या आर्थिक वर्षात संगणक खरेदी प्रक्रिया पूर्ण व्हावी, यासाठी जानेवारीत झालेल्या सर्वसाधारण सभेत १.३० कोटी रुपयांच्या संगणक खरेदीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली. प्रशासकीय मान्यता झाल्यावर ई-निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. गत दीड महिना ही प्रक्रिया पार पडल्यावर अखेर खरेदी केलेले संगणक जिल्हा परिषद प्रशासनाला प्राप्त झाले. प्राप्त झालेल्या संगणकांचे विभागनिहाय वितरण करण्यात आले.
असे झाले संगणकांचे वाटप
सामान्य प्रशासन विभाग (१५), टपाल कक्ष (४), मुख्य कार्यकारी अधिकारी व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालय (३), वित्त (६), ग्रामपंचायत (६), नरेगा (१), माध्यमिक शिक्षण (३), प्राथमिक शिक्षण (६), आरोग्य (६), ग्रामीण पाणीपुरवठा विभाग (२), बांधकाम क्र. १ (५), बांधकाम क्र. २ (५), बांधकाम क्र. ३ (५), महिला व बालकल्याण (४), पाणीपुरवठा व स्वच्छता (२), समाजकल्याण (३), पशुसंवर्धन (२), कृषी (२), लघुपाटबंधारे (३); तर १५ पंचायत समित्यांना प्रत्येकी पाच याप्रमाणे ७५ संगणक वाटप झाले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.