Nashik News : आश्रमशाळांत पहिल्याच दिवशी गणवेश; ‘आदिवासी विकास’कडून खरेदी

Nashik : दुसरीकडे राज्यातील आदिवासी आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी गणवेश देण्याची तयारी आदिवासी विकास विभागाने केली आहे.
Tribal Ashram School
Tribal Ashram Schoolesakal
Updated on

Nashik News : जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी गणवेश मिळण्याची शक्यता कमी असताना दुसरीकडे राज्यातील आदिवासी आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी गणवेश देण्याची तयारी आदिवासी विकास विभागाने केली आहे. याबाबत गणवेश खरेदीची निविदा न काढता शासनाच्या निश्चित दराप्रमाणे गणवेश खरेदी करण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते. त्यानुसार आदिवासी आश्रमशाळशाळेतील पावणेदोन लाख विद्यार्थ्यांना गणवेश मिळणार आहे. (Purchase uniform from Adivasi Vikas on first day of Ashram School )

आदिवासी विकास विभागाच्या राज्यात ४९९ शासकीय आश्रमशाळा आहेत. या आश्रमशाळेत जवळपास दोन लाख विद्यार्थी शिक्षण घेतात. या विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य खरेदी करण्यासह वसतिगृहांमध्ये निवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना गणवेश, शालेय साहित्य, नाइट ड्रेस पुरवले जातात. पूर्वी या साहित्याचे विभागाकडून वाटप होत होते. मात्र, यातील वाढत्या तक्रारींवर आदिवासी विद्यार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा (डीबीटी) करण्याचा निर्णय झाला होता.

परंतु ‘डीबीटी’तील उणिवा मांडत त्या विरोधात आमदारांनी तक्रारी करत थेट डीबीटी योजना रद्द करत शिंदे-फडणवीस-पवार सरकारने गतवर्षी ‘डीबीटी’ योजनेतून गणवेश संच, नाइट ड्रेस, शालेय साहित्य व लेखनसामग्री वगळण्याचा निर्णय घेतला. मात्र, यात शैक्षणिक वर्ष उलटूनही गणवेश खरेदी होईना. त्यामुळे विभागाने घाईघाईत ‘डीबीटी’ची रक्कम विद्यार्थ्यांना देत गणवेश खरेदी करण्यास सांगितले. (latest marathi news )

Tribal Ashram School
Nashik Crime News : गोडावूनमधून 25 टन लोखंडी सळ्या चोरीला

त्यामुळे गतवर्षीचा हा सावळागोंधळ लक्षात घेऊन आदिवासी विभागाने यंदा वेळेत गणवेश खरेदी करण्यासाठी तयारी सुरू केली आहे. यासाठी त्यांनी शैक्षणिक साहित्य सोडून गणवेश खरेदीचे शासनाच्या कॉन्ट्रक्टद्वारे खरेदी करण्याचे निश्चित केले आहे. यात पुरवठादाराकडून दहा दिवसांत गणवेश शिलाई करून घेतले जाणार आहेत.

कोणत्याही परिस्थितीत शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश मिळाला पाहिजे, यासाठी आदिवासी आयुक्त नयना गुंडे आग्रही आहेत. त्यानुसार गणवेशाची शिलाई करून घेतली जाणार आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी १५ जूनला आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना गणवेश देण्याची तयारी आदिवासी शिक्षण विभागाची आहे.

Tribal Ashram School
Nashik Crime News : कसबे सुकेणे येथे दोघांचा बियरची बाटली मारून एकास जिवे ठार मारण्याचा प्रयत्न

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.