येवला : अधूनमधून येणाऱ्या पावसावर खरीप तरला; मात्र दुष्काळी तालुक्यातला रब्बी हंगाम परतीच्या पावसावरच अवलंबून आहे. विशेषतः पश्चिम पट्ट्यासह पालखेडच्या लाभक्षेत्रात परिस्थिती चांगली आहे. मात्र अवर्षणप्रवण उत्तर- पूर्व भागातील अनेक गावांत रब्बीसाठी पुरेसे पाणी अजूनही उपलब्ध नसल्याने परतीच्या मुसळधार पाऊस पडून रब्बी फुलेल, हीच अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. उपलब्ध पाण्यावर उन्हाळ कांदे, गव्हाचे पीक घेतले जाईल. (Rabi fate depends on return of rain)