Radhakrishna Vikhe Patil : 5 लाख टन कांद्याच्या निर्यातीची केंद्राकडे मागणी : विखे पाटील

Nashik News : शेतकऱ्यांना वैयक्तिक स्वरूपाचे अनुदान सुरू ठेवण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी नाशिकमध्ये सांगितले.
Radhakrishna Vikhe Patil
Radhakrishna Vikhe Patilesakal
Updated on

Nashik News : कांदा उत्पादनात अग्रेसर असलेल्या नाशिक जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात कांद्याची निर्यात होऊ शकते. केंद्र सरकारकडे पाच लाख टन निर्यातीची मागणी नोंदविण्यात आली आहे. सरकारने त्याकडे लक्ष दिल्यास शेतकऱ्यांना अजून याचा फायदा होईल. सद्यःस्थितीत उन्हाळ कांद्याला चांगला भाव मिळत आहे. (Radhakrishna Vikhe Patil)

शेतकऱ्यांना वैयक्तिक स्वरूपाचे अनुदान सुरू ठेवण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी नाशिकमध्ये सांगितले. कांद्याच्या दराबद्दल मतमतांतरे आहेत, त्यासोबतच विविध प्रश्नही आहेत. सरकारकडे पाच लाख टन कांदा निर्यातीची मागणी आहे. एवढा कांदा आपण पुरवू शकत नाही.

शेतकऱ्यांच्या कांदा चाळीच्या अनुदानाचा प्रश्‍न आहे. वैयक्तिक अनुदानाऐवजी सामुदायिक अनुदान देण्याबद्दल तक्रारी आहेत. याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करण्यात येईल, असे आश्‍वासनही त्यांनी दिले. महाराष्ट्रामध्ये सध्या जास्त प्रमाणात दूध उत्पादन होते. (latest marathi news)

Radhakrishna Vikhe Patil
Nashik Police : मनोरुग्ण महिलेसाठी उपनगर पोलिसांकडून मानवतेचे दर्शन! उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल

प्रक्रिया व्यवस्था उपलब्ध नसल्याने गुजरातमधून चार मोठ्या उद्योगांना निमंत्रित करण्यात आले होते. सध्या ४० लाख लिटर दूध राज्यातून गुजरातला जाते. त्यांनी २० ते २५ लाख लिटर दूध आणखी घ्यावे, अशी त्यांना विनंती केली आहे. दुधाची भुकटी पडून आहे.

त्याच्या वितरणाचे नियोजन करायचे आहे. प्रत्यक्षात दुधाचा ३० रुपये दर निश्चित करण्यात आला असून, पाच रुपये अनुदानही निश्चित करण्यात आले असल्याचे विखे-पाटील यांनी सांगितले.

Radhakrishna Vikhe Patil
Nashik News : राजमाता जिजाऊ मार्गावरील पथदीप बंद!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.