नाशिक : शहरात शालेय-महाविद्यालयीन तरुणी, महिलांची छेडखानी करणाऱ्या टवाळखोरांसह चौका-चौकात चमकोगिरी करणाऱ्यांचे अड्डे तयार झाले आहेत. या चमकोगिरीला आळा घालण्यासाठी आणि टवाळखोरांना वठणीवर आणण्यासाठी पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी ‘गुंडा स्कॉड’ तयार करणार आहेत.
या स्कॉडमार्फत शहरातील टवाळखोरांवर पिंपरी-चिंचवड पॅटर्नप्रमाणे कारवाई केली जाणार आहे. नाशिकचे नवनियुक्त पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी पिंपरी चिंचवड येथे आयुक्त असताना शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी विविध स्कॉड तयार केले होते. या स्कॉडच्या माध्यमातून त्यांनी गुन्हेगारीला आळा घालतानाच शहरात व्हीज्युएबल पोलिसिंगवर भर दिला होता. त्यामुळे गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक निर्माण झाला होता. (Nashik ragging criminal stopping police commissioner higher gunda squad team Nashik News)
त्याच पद्धतीने नाशिकमध्येही गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आयुक्त शिंदे यांनी विशेष पोलिस पथके (स्पेशल स्कॉड) निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यानुसार, शहरातील अंमल पदार्थांविरोधात कारवाईसाठी ‘ॲण्टी नार्कोटिक्सड्रग्जस् स्कॉड’ असणार आहे. याचप्रमाणे शहरातील शाळा-महाविद्यालयांबाहेर चमकोगिरी करणारे, चौका-चौकात टवाळखोरी करणारे, तरुणी-महिलांची छेडखानी करणाऱ्यांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी पोलिस आयुक्त शिंदे यांनी ‘गुंडा स्कॉड’ची निर्मिती करणार आहे.
यासाठी आयुक्तांनी एक पोलिस निरीक्षकांसह दोन उपनिरीक्षक व महिला-पुरुष पोलिस कर्मचाऱ्यांचे पथके तयार केली जाणार आहे. या पथकांचे नियंत्रण गुन्हेशाखेचे पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांचे असणार आहे. येत्या जानेवारी महिन्यापासून हे पथक कार्यान्वित होऊन टवाळखोरांविरोधात कारवाई करण्यास सज्ज असणार आहे. थेट जेलची हवा चमकोगिरी व टवाळखोरी करणारे सोशल मीडियावरही मोठ्याप्रमाणात सक्रिय असतात. असे तरुण सोशल मीडियावर आक्षेपार्ह फोटो टाकतात. कधी वाढदिवसाचा केक हत्याराने कापणे, पिस्तूल बाळगून स्टाईलमध्ये फोटो टाकतात.
मात्र असे करणाऱ्यांवर गुंडा पथक काही तासांत कारवाई करून अशा चमकोगिरी करणाऱ्यांना थेट जेलची हवा खावी लागणार आहे. याची एक झलक दोन दिवसांपूर्वी आयुक्तांनी दाखवून दिली. सातपूरच्या कार्बन नाका परिसरात असलेल्या साई भंडाऱ्याचे होर्डिंग हटविताना या भंडाऱ्याचे आयोजक असणाऱ्यांविरोधात सातपूर पोलिसात थेट गुन्हा दाखल केल्याने होर्डिगमधून चमकोगिरी करणाऱ्यांना चांगलाच दणका बसला आहे.
हेही असतील विशेष पथके
"ॲण्टी नार्कोटिक्सड्रग्जस् स्कॉड’सह गुंडा स्कॉड, खंडणीविरोधी पथक, दरोडाविरोधी पथक या चार विशेष पथके पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या सूचनेनुसार तयार करण्यात येत आहेत. याशिवाय महिला पोलिसांचे एक विशेष दामिनी पथकही तयार केले जाणार आहे. या पथकांमार्फत शहरातील गुन्हेगारीला आळा बसण्यास मदत होणार आहे. कोट (फोटो) टवाळखोरी करणाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठीच गुंडा स्कॉड असेल. टवाळखोरच गुन्हेगारीकडे वळत असतात. त्यांना वेळीच कायदा समजला की अटकाव होतो. त्यासाठीच प्रतिबंधात्मक कारवाईच्या माध्यमातून टवाळखोरी मोडीत काढली जाईल."
- अंकुश शिंदे, पोलिस आयुक्त, नाशिक.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.