Nashik Rain Crisis: पाऊसच नसल्याने खतांना मागणी घटली; साठा पडून

fertilizer
fertilizeresakal
Updated on

Nashik Rain Crisis : पावसाळा सुरू होऊन अडीच महिने होऊनही समाधानकारक पाऊसच न पडल्यामुळे खरीप हंगामातील ७० हजार ७९१ टन खतांचा साठा शिल्लक आहे.

गेल्या रब्बी हंगामातील तब्बल ९८ हजार टन खते दुकानदार व कंपन्यांकडे पडून असल्याने यंदा शेतकऱ्यांना जादा दराने खतांची खरेदी करावी लागणार नाही. (Nashik Rain Crisis Due to lack of rain demand for fertilizers decreased Falling stock)

कृषी विभागामार्फत खरीप व रब्बी हंगामासाठी रासायनिक खते व बियाण्यांची मागणी केली जाते. खरिपासाठी यूरिया, डीएपी, एमओपी, एसएसपी, एनपीके, नॅनो यूरियाची एकूण दोन लाख ५८ हजार टन मागणी केली होती.

त्यापैकी दोन लाख ३५ हजार ९२७ टन खतांचा पुरवठा जिल्ह्याला झाला आहे. जून व जुलैमध्ये थोड्याफार प्रमाणात पाऊस झाल्यामुळे एक लाख ६५ हजार टन खतांची विक्री झाली.

नांदगाव, मालेगाव, निफाड, येवला, चांदवड या भागांत पेरण्या तर झाल्या; पण अर्धवट उगवलेल्या पिकांनाही आता पाणी मिळत नसल्याने त्या करपण्याच्या मार्गावर आहेत.

ऑगस्टमध्ये पाऊस पडल्यास किमान रब्बीचा हंगाम तरी पदरात पडेल, अशी अपेक्षा आहे. अशा परिस्थितीत पुन्हा पेरणी करण्यासाठी बियाण्यांची उपलब्धता आणि रासायनिक खतांचा पुरेसा साठा शिल्लक असल्याचे कृषी विभागाच्या आकडेवारीतून दिसून येते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

fertilizer
Nashik ZP: जिल्ह्यात आरोग्य केंद्रांमध्ये एकपासून सेल्फीद्वारे हजेरी; नाशिक तालुक्यात अंमलबजावणी सुरू

बोलके आकडे

२५८००० टन : खरिपासाठी मागणी

२३५९२७ टन : एकूण पुरवठा

१६५००० टन : खतांची विक्री

७०, ७९१ टन : खते शिल्लक

९८००० टन : रब्बी हंगामातील खते शिल्लक

fertilizer
Nashik BJP News: मध्य प्रदेशात प्रचारासाठी भाजपकडून फरांदेंसह नाशिकच्या चौघांना पाचारण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()