Nashik Rain Crisis: टंचाईच्या झळांनी पावणेदोन हजारांहून अधिक गावे- वाडेवासीय त्रस्त!

पुणे, नाशिकसह छत्रपती संभाजीनगरमध्ये ३८२ टँकर
Water Tanker
Water Tankeresakal
Updated on

Nashik Rain Crisis : पावसाच्या ओढीमुळे राज्यातील टंचाईची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. टंचाईच्या झळांनी ३६३ गावे आणि एक हजार ४०३ वाड्यांवरील रहिवासी त्रस्त आहेत.

या गावे आणि वाड्यांसाठी सद्यःस्थितीत ३८६ टँकरने पाणीपुरवठा सुरू असून, त्यातील ३८२ टँकर पुणे, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर विभागात सुरू आहेत. (Nashik Rain Crisis More than two thousand villages affected by shortages residents suffering)

ऐन पावसाळ्यात टँकरच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. गेल्या आठवड्यात ३५० गावे आणि एक हजार ३१९ वाड्यांना ३६९ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत होता.

त्या तुलनेत जालना जिल्ह्यात चार टँकर बंद झाले असले, तरीही नाशिक जिल्ह्यात दोन, जळगावमध्ये एक, नगरमध्ये पाच, साताऱ्यात नऊ, सांगलीमध्ये पाच टँकर वाढले आहेत.

पुणे विभागातील १५२ गावे आणि ९४० वाड्यांसाठी १६७, त्याखालोखाल नाशिक विभागातील १५४ गावे व ४४१ वाड्यांसाठी १३५ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. छत्रपती संभाजीनगर विभागातील ५३ गावे आणि २२ वाड्यांसाठी ८० टँकर सुरू आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Water Tanker
Nashik Rain Crisis : पाणी, चाराअभावी पशुधन विकण्याची वेळ! पाऊस नसल्याने पिके करपली

टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची स्थिती

जिल्ह्याचे नाव गावांची संख्या वाड्यांची संख्या सुरू टँकरची संख्या

नाशिक ७५ ६२ ६०

जळगाव १३ ० १५

नगर ६६ ३७९ ६०

पुणे ३४ २७४ ४०

सातारा ७८ ४०० ८३

सांगली २९ १७६ ३४

सोलापूर ११ ९० १०

छत्रपती संभाजीनगर ३० ४ ४१

जालना २३ १८ ३९

बुलडाणा ४ ० ४

Water Tanker
Nashik News: भाईगिरीच्या ‘रिल्स’ पडणार महाग! सायबर सेलचे विशेष लक्ष अन् कठोर कारवाईचे संकेत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.