Nashik Rain Crisis: द्राक्षांच्या 40 टक्के बागांची ऑक्टोबर छाटणी पावसाअभावी अडचणीत

संभाव्य पावसाच्या भरवशावर लवकर छाटणीचा विचार
grapes
grapessakal
Updated on

Nashik Rain Crisis : राज्यातील साडेचार लाख एकरापैकी ३५ ते ४० टक्के द्राक्षबागांची ऑक्टोबर छाटणी पुरेशा पावसाअभावी अडचणीत सापडली आहे. यापूर्वीच्या पावसाच्या अनुभवानुसार संभाव्य पावसाच्या भरवशावर १० ते १५ दिवस छाटणी करण्याचा विचार शेतकरी करताहेत.

महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे उपाध्यक्ष कैलास भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार सांगली जिल्ह्यात १५ ते २० सप्टेंबरपासून छाटण्यांना सुरवात होत असली, तरीही प्रत्यक्षात १० टक्के बागांमध्ये छाटणीची कामे झाली आहेत. (Nashik Rain Crisis October pruning of 40 percent of grape orchards in trouble due to lack of rain)

द्राक्षबागांची छाटणी लवकर केल्याने कमी तापमानात पाणी कमी लागेल आणि उपलब्ध पाण्यावर यंदाचा हंगाम पूर्ण करता येईल, अशी धारणा शेतकऱ्यांमध्ये आहे.

द्राक्षपंढरी म्हणून नावारूपाला आलेल्या बागलाण तालुक्यातील ‘अर्ली’ छाटणीची ९० टक्के कामे झाली असून, उरलेली छाटणीची कामे १५ सप्टेंबरपर्यंत पूर्ण होतील, अशी माहिती संघाचे संचालक भारत सोनवणे यांनी दिली.

ते म्हणाले, की गेल्या तीन वर्षांत अतिपाऊस झाल्याने बागलाण तालुक्यातील द्राक्षबागांचे क्षेत्र तुटून साडेचार हजार एकरवरून आता एक हजार २०० हेक्टरपर्यंत कमी झाले आहे.

यंदाच्या चौथ्या वर्षी पाऊस नाही. त्यामुळे पावसाने दडी कायम ठेवल्यास द्राक्षांच्या उत्पादनाचा गंभीर प्रश्‍न तयार होईल.

श्री. भोसले यांच्या माहितीनुसार नाशिक जिल्ह्यातील चांदवड पट्ट्यात द्राक्षांची छाटणी सुरू झाली आहे. वणी, सोनांबे-कोनांबे पट्ट्यात छाटणी सुरू होईल.

पोळा, गणेशोत्सव, नवरात्रोत्सवात पाऊस होत असल्याचा अनुभव शेतकऱ्यांना असल्याने उपलब्ध पाण्याचा विचार छाटणीसाठी करीत आहेत. जिल्ह्यात पावणेदोन लाख एकरावर द्राक्षांचे उत्पादन घेतले जाते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

grapes
Nashik Rain Crisis : चाऱ्याचे भाव गगनाला भिडले; पावसाअभावी प्रश्‍न गंभीर!

कमी पाऊस आणि टँकरमध्ये वाढ

राज्यात गेल्या वर्षी १०९.६ टक्के पावसाची नोंद झाली होती. यंदा आजअखेर ८१.६ टक्के पाऊस झाला आहे.

विभागनिहाय आतापर्यंत झालेल्या पावसाची टक्केवारी अशी : कोकण- ९७.४, नाशिक- ५५.५, पुणे- ५८.८, छत्रपती संभाजीनगर- ७४.४, अमरावती- ७८.९, नागपूर- ८९.९. नाशिक जिल्ह्यातील तालुकानिहाय आतापर्यंतच्या पावसाची टक्केवारी याप्रमाणे : मालेगाव- ५३.२, बागलाण- ६१.५, कळवण- ६८.९, नांदगाव- ४३.२, सुरगाणा- ६६.५, नाशिक- ४५.८, दिंडोरी- ९८.३, इगतपुरी- ४६.४, पेठ- ६५, निफाड- ५७.४, सिन्नर- ४२.३, येवला- ५५.७, चांदवड- ४२.८, त्र्यंबकेश्‍वर- ५८.१, देवळा- ५२.२.

जिल्ह्यात आतापर्यंत ५१.८ टक्के पाऊस झाला असून, गेल्या वर्षी १२४ टक्के पाऊस झाला होता. पावसाची ही स्थिती पाहता, राज्यातील टँकरच्या संख्येत गेल्या आठवड्याच्या तुलनेत २० ची भर पडली आहे.

त्यात नाशिक जिल्ह्यात आठ, धुळ्यात एक, अहमदनगरमध्ये तीन, साताऱ्यात तीन, सोलापूरमध्ये चार, यवतमाळमध्ये एका टँकरचा समावेश आहे.

जिल्ह्यानिहाय टंचाईग्रस्त गावे आणि वाड्यांची संख्या पुढीलप्रमाणे असून (कंसात जिल्ह्यात सुरू असलेल्या टँकरची संख्या दर्शविते) : नाशिक- ८४- ९५ (६८), धुळे- १- ० (१), जळगाव- १३- ० (१५), नगर- ७०- ४०६ (६३), पुणे- ३७- २७४ (४०), सातारा- ८२- ३९८ (८६), सांगली- २९- २५१(३४), सोलापूर- १४- १२१ (१४), छत्रपती संभाजीनगर- ३०- ४ (४१), जालना- २३- १८ (३९), बुलढाणा- ४०- ० (४), यवतमाळ- १- ० (१).

पावसाचा अंदाज

द्राक्ष बागायतदारांच्या माहितीसाठी हवामानाचा अभ्यास केला जातो. अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार ७ ते ९, १५ ते २० आणि २५ ते २९ सप्टेंबरदरम्यान वळीव स्वरूपात पावसाचा अंदाज आहे.

पावसासाठी हवामानाच्या तयार झालेल्या स्थितीनुसार हा अंदाज आहे. या महिन्यात २०० मिलिमीटरपर्यंतचा पाऊस अपेक्षित असून, परतीच्या पावसापासून १०० मिलिमीटर पावसाचा अंदाज आहे.

मात्र, तरीही हवामान अभ्यासकांच्या माहितीनुसार या कालावधीत ३०० ते ३२५ मिलिमीटर पावसाऐवजी ७५ मिलिमीटरने कमी पावसाची शक्यता आहे.

grapes
NMC News: महापालिकेच्या चालढकल योजनेला ‘ब्रेक’! ‘एन-कॅप’ योजनांना 3 महिन्यांचा अल्टिमेटम

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()