Nashik Rain Crisis: पावसाअभावी खरीप हंगामातील पिकांसह डाळींब बागाही लागल्या सुकू

Pomegranate Crop
Pomegranate Cropesakal
Updated on

Nashik Rain Crisis : जिल्ह्यात बहुतांश भागात पावसाअभावी दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून शेतातील पिके करपू लागले तर डाळींब बागाही सुकू लागल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

सद्यस्थितीत भयावह भर पावसाळ्यात दुष्काळसदृश परिस्थितीमुळे खरीप हंगामातील पिकांसह डाळींब बागा अडचणीत आले आहेत. हजारो रूपये खर्चून पेरणी केलेल्या पिकांनी पावसाअभावी माना टाकल्याने शेतकऱ्यांवर नुकसान सोसण्याची वेळ आली आहे. (Nashik Rain Crisis Pomegranate orchards along with Kharif season crops will dry up due to lack of rain)

कसमादे हे नाशिक जिल्ह्यातील डाळींबाचे आघार मानले जाते. मात्र पावसाच्या प्रतीक्षेत असलेले डाळींब उत्पादक शेतकऱ्यांना बागा जगविण्यासाठी मोठा प्रश्न उभा ठाकला आहे. बहुतांश डाळींब उत्पादक शेतकऱ्यांनी भरमसाठ खर्च करून लगडलेल्या डाळींब बागांना टॅकरव्दारे पाणी देऊन बागा जगविण्याची खटाटोप करीत आहेत.

यामुळेच फळबागेवरील केलेला खर्च यंदाच्या भयानक दुष्काळसदृश परिस्थितीत वाया जातो की, काय अशी परिस्थिती आहे. दुसरीकडे पावसाच्या भिस्तवर शेतात बाजरी, मका, सोयाबीन तसेच कडधान्याची पेरणी केलेल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात निराशा झाली आहे.

ज्या शेतकऱ्यांच्या विहिरीत मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध आहे. त्या शेतकऱ्यांनी शेतातील पिके वाचविण्यासाठी रात्रीचा दिवस करून धडपड करीत आहेत.

यंदा भयंकर दुष्काळसदृश परिस्थितीमुळे शेतीपिके पाण्याअभावी जळू लागली आहेत. त्यामुळे अर्थिक नियोजन पूर्णता कोलमडून गेल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Pomegranate Crop
Nashik Rain Crisis: मुस्लिम बांधवांकडून पावसासाठी विशेष दुवा

दुष्काळी झळा

 जिल्ह्य़ातील बहुतांश भागातील गावात आजही टॅकरने पाणीपुरवठा सुरू आहे. पाऊस नाही त्यामुळे शेतात पीक नाही.

पीक नसल्याने उत्पन्न नाही तर जनावरांना चारा आणायचा कुठून यामुळे जनावर बाजारात विक्रीसाठी पर्याय नसल्याने जगायचे कसे या विवंचनेत शेतकरी सापडला असून शेतकरी सापडला आहे.

मेंढपाळ मेंढरांच्या चारापाण्यासाठी वनविभागाकडून राखीव क्षेत्र चराईसाठी खुले करण्याची मागणी करीत आहेत. शेतीशिवारातही भुरट्या चोऱ्यांचे सत्र सुरू झाले आहे. 

 "आमच्या भागातील सुराणे, दुंधे डॅम व चिरखांड डॅम यावर्षी पूर्ण कोरडेठाक आहेत. वयोवृद्ध शेतकरी सांगतात असा दुष्काळ आम्ही सुद्धा बघितला नाही. फळबागा व पशुधन जगवणे कठीण होऊन बसले आहे."- अशोक आहिरे, सरपंच वायगाव.

"तालुक्यात शेतीशिवारातील अनेक विहीरी पावसाळ्यात कोरडेठाक पडले आहेत. ज्या शेतकऱ्यांच्या शेतातील विहिरीत मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध आहे. पिके वाचविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांचे पिकांची वाढही खुंटली आणि करपूनही गेली." - केवळ देवरे, करंजाड.

"भर पावसाळ्यात उन्हाळ्यातली परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रशासनाने पुढील निर्माण होणारी भीषण पाणीटंचाई लक्षात घेऊन नियोजन करणे गरजेचे आहे."- दिनेश देसले, गोराणे सरपंच.

Pomegranate Crop
Nashik Rain Crisis: द्राक्षांच्या 40 टक्के बागांची ऑक्टोबर छाटणी पावसाअभावी अडचणीत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.