Nashik Rain Crisis: पावसाने पाठ फिरवल्यामुळे लासलगाव येथे शेतकऱ्याने 9 एकर सोयाबीन पिकावर फिरवला रोटर

Farmer Harshad Holkar rotating the rotor on soybean crop
Farmer Harshad Holkar rotating the rotor on soybean cropesakal
Updated on

लासलगाव : येथे पावसाने दडी मारल्यामुळे पाण्याअभावी शेतात उभे सोयाबीनचे पीक करपून गेल्याने संतप्त झालेल्या तरुण शेतकऱ्याने नऊ एकरांवरील सोयाबीनच्या पिकावर रोटर फिरवून संपूर्ण पीक भुईसपाट केले. (Nashik Rain Crisis Rotor turned on 9 acres of soybean crop no rain at lasalgaon)

गेल्या वर्षी येथील तरुण शेतकरी हर्शद होळकर यांनी नऊ एकरांवर सोयाबीनचे पीक घेतले होते. त्यातून साडेतीन ते चार लाख रुपयांचे भरघोस उत्पन्न घेतले होते.

त्यानुसार यंदाही सोयाबीन पिकातून चांगले उत्पन्न मिळेल, या आशेने सोयाबीन पीक घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि सुरवातीला झालेल्या रिमझिम पावसावर सोयाबीन पिकाची पेरणी केली.

पाऊस कमी असल्याने दुबार पेरणी करत सोयाबीनचे पीक घेतले. मात्र, पावसाने सलग ५० दिवस दडी मारल्यामुळे पाण्याअभावी सोयाबीनचे पीक जळू व करपू लागले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Farmer Harshad Holkar rotating the rotor on soybean crop
NMC News: काम पूर्ण होण्याअगोदरच काँक्रिट रस्त्याची लागली वाट!

शेंगा न आल्यामुळे लाख रुपये खर्च केलेल्या सोयाबीन पिकाचे करायचे काय, असा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला. गेल्या आठवड्यात रिमझिम पाऊस झाला.

मात्र, त्याचा काहीच फायदा न झाल्याने हताश झालेला हर्षद या तरुण शेतकऱ्याने नऊ एकर क्षेत्रावरील सोयाबीन पिकावर बुधवारी (ता. १३) रोटर फिरून संपूर्ण पीक भुईसपाट केले.

राज्य सरकारने दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना भरघोस मदत करावी, तसेच सक्तीची कर्जवसुली थांबवावी, अशी मागणी हर्शद होळकर यांनी या वेळी केली.

Farmer Harshad Holkar rotating the rotor on soybean crop
Mahavitaran News: वेळेत वीजबिले भरण्याचे महावितरणकडून आवाहन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.