Nashik Rain Crisis : दिंडोरी तालुक्यातील तिसगाव धरण पावसाळा सुरू होऊन कोरडेच आहे. यामुळे तिसगाव धरणातून दहा ते १२ गावांचा पाणीप्रश्न निर्माण झाला आहे.
पुणेगाव धरणातील पाणी तिसगाव धरणात सोडण्याची मागणी तिसगाव धरण पाणी वापर महासंघ व शिंदवड ग्रामपंचायतीने केली आहे.
याबाबत जिल्हाधिकारी व पालखेड पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंत्यांना निवेदन दिले आहे. (Nashik Rain Crisis Tisgaon Dam still dry Water problem of 10 to 12 villages)
दिंडोरी तालुक्यातील सहापैकी तिसगाव धरणात शून्य टक्के पाणीसाठा आहे. तिसगाव धरणातून १० ते १२ गावांना पाणीपुरवठा होतो. तिसगाव धरणावर पाणी वापर महासंघ स्थापन झाला आहे.
त्या अंतर्गत परिसरातील व निफाड तालुक्यातील काही गावांना शेतीसाठी पाणी वापराचे नियोजन केले जाते. मागील वर्षी ऑगस्टच्या सुरवातीलाच तिसगाव धरण शंभर टक्के भरले होते.
मात्र, यंदा शून्य टक्के साठा असल्याने शिंदवड, खेडगाव, तिसगाव, गोंडेगाव, जऊळके वणी, बोपेगाव, सोनजांब, तळेगाव वणी येथील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी व शेतीसाठी मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
सर्व ग्रामपंचायती व तिसगाव धरण महासंघाने जिल्हाधिकारी जलज शर्मा व कार्यकारी अभियंता वैभव भागवत यांना निवेदन देण्यात आले.
पुणेगाव धरणात मांजरपाडा वळण योजनेद्वारे मुबलक साठा झाला असून, पुणेगाव धरणातील पाणी तिसगाव धरणात सोडल्यास बऱ्यापैकी शिंदवड व परिसरातील गावांचा पिण्याच्या पाण्याचा व शेतीच्या पाण्याचा भविष्यातील प्रश्न मिटणार आहे. त्यामुळे पुणेगाव धरणातील पाणी तिसगाव धरणात सोडण्याची मागणी निवेदनात केली आहे.
निवेदन देतेवेळी खेडगावचे सरपंच दत्तात्रय पाटील, सुरेश डोखले, माणिकराव पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य भास्कर भगरे, अशोक भालेराव, वसंतराव जाधव, रामभाऊ ढगे, रमेश भालेराव, शरद भालेराव, बबन भालेराव, तुषार भालेराव, रोशन ढगे, राजेंद्र पाटील, तुळशीराम पाटील, मोतीराम जाधव, संजय जाधव, रावसाहेब जाधव, सुनील पाटील, अनिल कावळे, दत्तात्रय कावळे, शिवा बस्ते, विनोद जाधव आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.