Nashik Rain Yellow Alert : शहर- जिल्ह्यात पावसाची हजेरी! पुढील तीन दिवस ‘यलो’ अलर्ट; यात्रोत्सवावर पावसाचे सावट

Latest Rain Alert News : हवामान विभागाने पुढील तीन दिवस ‘यलो अलर्ट’ जारी केल्यामुळे यात्रोत्सवाच्या आनंदावर विरजन पडण्याचे सावट निर्माण झाले आहे.
Return rains in Kersane on Wednesday caused water to accumulate in steamers where summer season onion seeds were sown.
Return rains in Kersane on Wednesday caused water to accumulate in steamers where summer season onion seeds were sown.esakal
Updated on

Nashik Rain Yellow Alert : शारदीय नवरात्रोत्सव ऐन रंगात आलेला असताना बुधवारी (ता.९) सायंकाळी पावसाने शहरासह जिल्ह्यात हजेरी लावली. हवामान विभागाने पुढील तीन दिवस ‘यलो अलर्ट’ जारी केल्यामुळे यात्रोत्सवाच्या आनंदावर विरजन पडण्याचे सावट निर्माण झाले आहे. (Yellow alert for next three days)

दिवसभर अभ्राच्छादित आकाश राहिल्याने सूर्यप्रकाश पडला नाही. बुधवारी सकाळपासूनच पावसाचे संकेत दिसत असताना शहरात दुपारी ४ वाजेला पावसाला सुरुवात झाली. साधारणतः: एक ते दीड तास मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. त्यामुळे जनजीवन विस्कळित झाले.

अचानक झालेल्या पावसाने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. सायंकाळपर्यंत पावसाचे वातावरण कायम राहिल्यामुळे नवरात्रोत्सवासाठी बाहेर पडणाऱ्या भाविकांची अडचण झाली. जिल्हा प्रशासनाने रात्री १२ वाजेपर्यंत लाऊडस्पीकर वाजवण्यास परवानगी दिलेली असताना पावसामुळे भाविकांच्या आनंदावर पावसाने विरजण पाडले.

शहराच्या विविध भागांत पावसाने हजेरी लावली. दिवसभरात सहा मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. याशिवाय ग्रामीण भागातही पावसाने हजेरी लावली. यात सिन्नर, निफाड, लासलगाव, दिंडोरी, त्र्यंबकेश्‍वर, इगतपुरी, बागलाण येथे पाऊस पडला. पुढील तीन दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे.

द्राक्ष बागांना फटका, कांद्याला फायदा

परतीच्या पावसामुळे द्राक्ष बागांना फटका बसण्याची शक्यता आहे. पावसापेक्षाही सकाळी धुके मोठ्या प्रमाणात पडते. त्यामुळे द्राक्ष बागांवर फवारणी करावी लागते. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढतो. लाल कांद्याची लागवड झाली आहे. त्याला पाणी देण्यासाठी चांदवड, येवला, नांदगाव, मालेगाव, देवळा या भागात अजूनही पुरेसा पाऊस झालेला नाही. येथील शेतकऱ्यांना दमदार परतीच्या पावसाची अपेक्षा लागून आहे. (latest marathi news)

Return rains in Kersane on Wednesday caused water to accumulate in steamers where summer season onion seeds were sown.
Jalgaon Heavy Rain: खरिपाच्या उत्पादनात घट होण्याची भीती! परतीच्या पावसाचा फटका; चोपडा तालुक्यातील बळीराजा नुकसानीने चिंताग्रस्त

वादळी वाऱ्याने सोलर प्लेटाचे नुकसान

मळगाव (ता. मालेगाव) येथे ३ ऑक्टोबरला वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला. या भागातील अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. मळगाव शिवारातील गट नंबर ८५-४८ मधील भागाबाई शंकर पाटील यांच्या विहिरीजवळ लावलेल्या साडे सात अश्‍वशक्तीच्या सोलारच्या प्लेटा वादळी वाऱ्याने खराब झाल्या आहे.

कांदा बियाण्यांचे नुकसान

नरकोळ (ता. बागलाण) : जाखोडसह नरकोळ, मुंगसे पाडा, मुंगसे, केरसाणे आदि भागात बुधवार (ता.९) सायंकाळी चार वाजता विजेच्या कडकडासह पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. मागील आठवड्यात टाकलेल्या उन्हाळी हंगामातील कांदा बियाण्याची पावसामुळे वाट लागली. सध्या बाजरी, मका कापणी व भुईमूग काढणीचे कामे जोरात सुरू असून या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा अडथळा निर्माण झाला आहे.

Return rains in Kersane on Wednesday caused water to accumulate in steamers where summer season onion seeds were sown.
Maharashtra Rain Alert: राज्यात आज 'या' जिल्ह्यात बरसणार परतीचा पाऊस! हवामान विभागाचा इशारा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.