Nashik Rain Update : जिल्ह्यात 17 दिवसामध्ये 222 टक्के परतीचा पाऊस

rain update
rain updateesakal
Updated on

नाशिक : जिल्ह्यात सरासरी ३४.५ मिलिमीटर पाऊस ऑक्टोबरमध्ये अपेक्षित असतो. मात्र परतीचा पाऊस धो-धो कोसळत असल्याने गेल्या १७ दिवसांमध्ये सरासरी पावसाच्या तुलनेत जिल्ह्यात २२१.७ टक्के पावसाची नोंद झाली आहे. सुरगाणासह उंबरठाणमध्ये गेल्या २४ तासात प्रत्येक मंडलात १०७.५ मिलिमीटर पाऊस कोसळल्याने ढगफुटी सदृश स्थिती आदिवासी बांधवांनी अनुभवली. त्याचवेळी सिन्नरमधील भोजापूर धरणाचे पाणलोट आणि पश्‍चिम पट्यात जोरदार पाऊस झाल्याने म्हाळुंगी नदीला यंदाच्या पावसाळ्यातील तिसरा पूर आला आहे. (Nashik Rain Update 222 percent return of rain in 17 days in district Nashik News)

rain update
Fake Medical Certificate Case : 'ते' 16 पोलिस कर्मचारी ‘Not Reachable’

भोजापूर धरणाच्या सांडव्यावरून २ हजार ८०० क्युसेसने विसर्ग सुरु आहे. भाजीपाल्याचे आगार म्हणून नावारूपाला आलेल्या दापूरला सलग दुसऱ्यांदा फटका बसला आहे. नाशिक शहरामध्ये आज सकाळी साडेआठला संपलेल्या चोवीस तासात १९.८ आणि त्यानंतर सायंकाळी साडेपाचपर्यंत २१ मिलिमीटर पाऊस झाला. सायंकाळनंतर शहर आणि परिसरात मुसळधार पाऊस कोसळत होता.

आज सकाळी संपलेल्या चोवीस तासात तालुकानिहाय काही मंडलात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये असा : मालेगाव तालुका : वडनेर-७३.८, कळवाडी-६८.५, सौंदाणे-२३.८. नांदगाव तालुका : वेहळगाव-६८.५. नाशिक तालुका : शिंदे-२६.८, माडसांगवी-१८.५. दिंडोरी तालुका : मोहाडी-६६.३, ननाशी-३२.८, कसबेवणी-३५.५, वरखेडा-३१.३. इगतपुरी तालुका : वाडीवऱ्हे-४१.८, नांदगाव सदो-७०.३, टाकेद-६९.५. पेठ-१४.८. निफाड तालुका : रानवड-४९.८, सायखेडा-४१.३, ओझर-२९.८, नांदूरमधमेश्‍वर-२२.८. सिन्नर तालुका : पांढुर्ली-३७.८, वावी व शहा-प्रत्येकी १०.३. येवला-२५.३. चांदवड-२१.५, दिघवद-२१.५, दुगाव-२८.५. त्र्यंबकेश्‍वर-२६.५.

rain update
MSRTC Fare Rates Hike : ‘ST' साठी शुक्रवारपासून मोजावे लागणार जादा भाडे!

जिल्ह्यात १२५.६ टक्के पाऊस

यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्यात आतापर्यंत १२५.६ टक्के पाऊस झाला आहे. तालुकानिहाय आतापर्यंत झालेल्या पावसाची टक्केवारी अशी :

मालेगाव-१५५ बागलाण-१५९.६

कळवण-१६८.५ नांदगाव-१४१.३

सुरगाणा-१२८.१ नाशिक-१४२.९

दिंडोरी-२२३.७ इगतपुरी-७६.३

पेठ-१३२.९ निफाड-१५६.४

सिन्नर-१४५.३ येवला-१२५.९

चांदवड-१८९.९ त्र्यंबकेश्‍वर-१०१

देवळा-१६५.६ (गेल्यावर्षी ८६.८ टक्के पाऊस)

rain update
Deputy Commissioner of Police संजय बारकुंड ठरले सायकलिंगचे ‘Super Randonneur’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.