Nashik News : निमगाव देवपूर (ता.सिन्नर) येथील शिवारात सुसाट वादळी वाऱ्याने रस्त्यावर बाभळीचे झाड उन्मळून पडले आहे. त्यामुळे शिर्डी सुरत महामार्ग वाहतुक विस्कळीत झाली आहे.
स्थानिक शेतकरी बांधवांनी बाभळीचा उन्मळून पडलेला काही भाग कुऱ्हाडीच्या साह्याने तोडला. त्या उन्मळून पडलेला बाभळीच्या झाडाखाली वाहने हळूहळू मार्गक्रमण करत आहेत. (Nashik Rain Update Acacia tree fell down on Shirdi Surat highway Traffic stopped Nashik News)
सिन्नर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी हा बाभळीचा वटवृक्ष हटवावा अशी मागणी ग्रामस्थांसह वाहनधारकांनी केली आहे.
बाभळीचा वटवृक्ष महामार्गांवर बोगदा तयार झाला आहे. येथील शिवारात दुपारी एकच्या सुमारास सुसाट वाऱ्याने दोन तीन तास धुमाकूळ घातला आहे.
त्यामुळे रस्तावर व शेततळ्यात झाडे उन्मळून पडले आहे. येथे गावच्या मंदिराजवळ शिर्डी सुरत महामार्ग बाभळीचा वटवृक्ष उन्मळून पडला. त्यावेळी काशिनाथ जगताप घराकडे ट्रॅक्टर घेऊन येते होते. झाडांच्या आवाजाने ते थांबले.
त्यावेळी बाभळी झाड रस्त्यावर पडले.आज रविवारी असल्याने ह्या मार्गाने शिर्डी ला साईबाबांच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांची संख्या वाढली होती.
येथून वडांगळीला बंजारा भाविकांची कुलदैवत सतीदेवी सामतदादा मंदिराचे दर्शन घेऊन परतत होते. काही भाविक येत होते. शेतकरी काशिनाथ जगताप अमोल क्षिरसागर दत्तात्रय शेलार यांनी वाहने जाण्यासाठी बाभळीचा काही भाग तोडला.
महामार्गावर बाभळी खाली वळण रस्ता तयार झाला. ह्या बाभळीच्या शेजारी झाडांवर महावितरण कंपनीच्या तुटलेल्या तारा पडलेल्या आहेत. शेतकरी बांधवांनी तारा रस्ता च्या बाजूला सरकवून ठेवल्या आहेत.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
शिर्डी महामार्ग बाभळीचा वटवृक्ष उन्मळून बोगदा तयार झाला आहे. येथून हळूहळू वाहने घेऊन वाहनधारक जात आहे. निमगाव व जुना देवपूर फाटा चिंचबन हुन देवपूर ला जाणारा रस्ता असा व्ही आकाराच्या वळणजवळ महामार्ग बाभळीचा वटवृक्ष बोगदा आहे.
सिन्नर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी हा बाभळीचा वटवृक्ष हटवावा अशी मागणी केली आहे. ह्या मार्गावर फुटलेला रस्ता व मोठी खड्डे पडले आहेत. त्यामुळे साई भक्तांची कसरत सुरू आहे. बाभळीचा वटवृक्ष उन्मळून पडला आहे. तो जे सी बी साह्याने हटविल्यास वाहतूक सुरळीत होईल.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.