Nashik Rain Update : जिल्ह्यात काही ठिकाणी बुधवारी (ता. २) आणि गुरुवारी (ता. ३) मेघगर्जना, विजांच्या कडकडासह पाऊस होण्याची शक्यता इगतपुरीच्या ग्रामीण कृषी हवामान केंद्रातर्फे वर्तविण्यात आली आहे.
दुसरीकडे राज्यात द्राक्ष उत्पादकांसाठी हवामानशास्त्राचा अभ्यास करणाऱ्यांनी ऑगस्टच्या मध्यापर्यंत नाशिक, धुळे, नंदुरबार, नगर जिल्ह्यांत सर्वदूर चांगला पाऊस होण्याबद्दल धाकधूक व्यक्त केली.
या कालावधीत दोन ते दहा मिलिमीटर पाऊस होण्याचा अभ्यासकांचा अंदाज आहे. (nashik rain update Chance of rain with thunder in district today and 3 august news)
बंगालच्या उपसागरातील वादळामुळे तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्याच्या इतर भागांत चांगला पाऊस होईल, असाही अभ्यासकांचा अंदाज आहे. दरम्यान, जिल्ह्यात २ ते ६ ऑगस्टदरम्यान मध्यम पावसाची शक्यता इगतपुरीच्या केंद्रातर्फे वर्तविण्यात आली आहे.
पाच दिवस ढगाळ हवामान राहील. तापमान कमाल २५ ते २७ आणि किमान २१ ते २२ अंश सेल्सिअस, तर वाऱ्याचा वेग तासाला २६ ते ३२ किलोमीटर राहण्याची शक्यता आहे.
पाच धरणांतून पाच हजार क्युसेस विसर्ग
नाशिक जिल्ह्यातील सात मोठी आणि १७ मध्यम अशा एकूण २४ धरणांमधील साठा ५५ टक्क्यांपर्यंत पोचला आहे. भावली आणि हरणबारी धरण ‘फुल्ल' झाले. गेल्या वर्षी १ ऑगस्टपर्यंत धरणांमधील साठा ८४ टक्के झाला होता आणि नऊ धरणे ‘फुल्ल’ झालेली होती.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
सद्यस्थितीत ८३ टक्के भरलेल्या दारणा धरणातून एक हजार २५०, ‘भावली’तून १३५, ८२ टक्के भरलेल्या ‘कडवा’तून ५०४, ‘नांदूरमध्यमेश्वर’मधून दोन हजार ४२१, ‘हरणबारी’तून ८४६ असा एकूण पाच हजार १५६ क्यूसेस विसर्ग सुरू आहे.
गंगापूर धरणातील विसर्ग बंद करण्यात आला असून, या धरणात सद्यस्थितीत ७९, तर करंजवण ४३, वाघाड ५१, ओझरखेड २८, पुणेगाव ६१, मुकणे ७०, वालदेवी ८८, भोजापूर ४६, चणकापूर ५२, केळझर ८१ आणि ‘गिरणा’मध्ये ३३ टक्के जलसाठा आहे.
तालुकानिहाय पावसाची स्थिती
तालुक्याचे नाव आतापर्यंत पावसाची टक्केवारी १ ऑगस्ट २०२२ पाऊस टक्के
मालेगाव ७७.७ १६७.१
बागलाण ८०.१ १७१.४
कळवण ८८.२ २१७
नांदगाव ५८.१ १५१.९
सुरगाणा ८९.७ १६०.७
नाशिक ५६.८ १४३.९
दिंडोरी ११९.४ २७३.७
इगतपुरी ६१.५ ६६.८
पेठ ८९.५ १८८.३
निफाड ७५.२ १७६.८
सिन्नर ५४.६ ११९.८
येवला ६९.५ १३४
चांदवड ४९.६ १९४.६
त्र्यंबकेश्वर ७१.४ ११३.५
देवळा ७१.७ १८६.९
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.