Nashik Civil Hospital : सिव्हिलच्या आवारातच पावसाच्या पाण्याचे तळे; आरोग्याच्या मंदिरातच वाताहत

Civil Hospital : शहर-जिल्ह्यात डेंगीचा कहर वाढलेला असताना, जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या आवारात मात्र पावसाच्या पाण्याचे तळेच तळे साचले आहेत.
Rain water accumulated in the premises of the district hospital.
Rain water accumulated in the premises of the district hospital.esakal
Updated on

Nashik Civil Hospital : शहर-जिल्ह्यात डेंगीचा कहर वाढलेला असताना, जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या आवारात मात्र पावसाच्या पाण्याचे तळेच तळे साचले आहेत. त्यामुळे रुग्णांसह नातेवाइकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असून, जिल्हा रुग्णालयाकडून मात्र कोणतीही उपाययोजना होताना दिसून आलेली नाही. त्यामुळे नागरिकांसह कर्मचाऱ्यांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शहरात गेल्या तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. ( Rain water pond within premises of Civil Hospital Civil )

तर दुसरीकडे गेल्या काही आठवड्यांपासून शहर-जिल्ह्यात डेंगीसह चिकून गुनिया आणि ताप-थंडीच्या रुग्णांची संख्या लक्षणीय स्वरूपात वाढलेली आहे. सरकारी रुग्णालयांसह खासगी रुग्णालयांमध्ये रुग्ण उपचार घेत आहेत. जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर, बाह्य रुग्ण कक्षाबाहेर, तसेच अपघात विभागासमोरही पाणी साचलेले आहे. गेल्या तीन दिवसांपासून पाण्याचे तळे जसेच्या तसे आहेत. (latest marathi news)

Rain water accumulated in the premises of the district hospital.
Nashik Civil Hospital: ना दुर्गंधी.. ना अस्वच्छता... एकदम चकाचक...! नाशिक जिल्हा रुग्णालय टाकतेय कात

या पाण्यात डेंगी डासांची उत्पत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच, अनेक ठिकाणी ड्रेनेज लाइनचे काम सुरू असल्याने त्या खड्ड्यातही दूषित पाणी साचून आरोग्याची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे रुग्णालयात उपचारार्थ असलेले रुग्ण व नातलगांच्या आरोग्याला धोका उत्पन्न झाला आहे. परिसरातील घाण, दुर्गंधी यामुळे डासांचाही प्रादुर्भाव वाढलेला आहे. यासंदर्भात रुग्णालयाकडून कोणतीही ठोस उपाययोजना होत नसल्याने रुग्णांच्या नातलगांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

Rain water accumulated in the premises of the district hospital.
Nashik Civil Hospital : पंचनामा न होताच मृतदेह रात्रभर शवविच्छेदन कक्षाबाहेर! ‘सिव्हिल’चा भोंगळ कारभार पुन्हा उघड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.