Nashik News : पक्षांच्या 22 पिल्लांचे संगोपन! विहिरीच्या खोदकामात वाचविले पक्षी

Nashik News : घरट्यातील पिल्ले वाचवण्यासाठी खटपट करून त्यांचे संगोपन करणे विरळच. मात्र असाच प्रयत्न मालेगाव येथील पक्षी मित्र सुमीत अहिरे करीत आहे त्यांनी २२ पिलांना वाचवून त्यांच्या पंखात बळ भरले.
Nitin Bachhao rescues baby birds from the well skull with the help of JCB
Nitin Bachhao rescues baby birds from the well skull with the help of JCBesakal
Updated on

मालेगाव शहर : 'पक्षी वाचवा, जंगल वाचवा' फक्त बोललं जाते , मोबाईल विश्वात रममाण माणसांमधील संवाद कमी झाला आहे. अशा वेळी घरट्यातील पिल्ले वाचवण्यासाठी खटपट करून त्यांचे संगोपन करणे विरळच. मात्र असाच प्रयत्न मालेगाव येथील पक्षी मित्र सुमीत अहिरे करीत आहे त्यांनी २२ पिलांना वाचवून त्यांच्या पंखात बळ भरले. (Raising 22 puppies of birds saved in well digging)

पाण्याच्या टंचाईमुळे तळवाडे (ता. मालेगाव) येथे विहिरीचे खोदकाम करताना बाभळीच्या झाडाला विहिरीत 'सुगरणीचा खोपा' होता.पक्षी प्रेमी सुमीत अहिरे यांनी नितीन बच्छाव यांच्यासह जेसीबी बोलावून विहिरीतील बाभळीच्या झाडाला टांगलेले खोपे व त्यातील पिल्लांना आणि एक एक अंडी सुरक्षित काढली.

आसपासच्या शेतकरी आणि मजुरांनी मदत केली. त्यांच्या पत्नी डॉ.शुभांगी अहिरे, मुलगी आदीच्या मदतीने सोळा घरट्यातून अठरा पिल्ल व चार अंडे वाचविली. संबंधित पिल्लांना कसे खाऊ घालायचे हा प्रश्न सोडविण्यासाठी घरातील एक खोली फक्त पिल्लाच्या संगोपनासाठी होती. (latest marathi news)

Nitin Bachhao rescues baby birds from the well skull with the help of JCB
Vidhan Sabha Election: विधानसभेसाठी महायुतीचं ठरलं, २० ऑगस्टपासून सभा अन् मेळावे

विविध वयोगटातील पिल्लात पंख फुटलेले, डोळे उघडलेले, नुकतीच अंड्यातून बाहेर आलेली अशा सगळ्या पिल्लांच्या संगोपना दरम्यान खोलीचा दरवाजा उघडताच चाहुलीने एकच गोंधळ उड़ायचा. अहिरे यांचा या पिल्ला समवेत मायेचा लळा व दिनक्रम झाला. त्यांनी हळूहळू पिलांच्या पंखात बळ भरले. अहिरे कुटुंबाने काही काळानंतर ही पाखरे निसर्गाच्या हवाली केली.

"पक्षी संवर्धनासाठी नागरिकांचा पुढाकार गरजेचा आहे. उकाडा सहन करणे असह्य होत असताना 'पक्षी वाचवा' उपक्रमाची गरज आहे. वृक्षतोड, मोबाईल टॉवर आणि इंटरनेटमुळे पक्षांना धोका पोहोचतो. सुचनांपेक्षा कृतीशील होण्याची गरज आहे."

- सुमीत अहिरे पक्षी मित्र, मालेगाव.

Nitin Bachhao rescues baby birds from the well skull with the help of JCB
Fishing Gear Rates Hike: मासे पकडण्याच्या साहित्याच्या किंमतीत वाढ! धरण भरल्याने मासेमारीतील तरुणाचा सहभाग वाढला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.