Nashik News : राज राजेश्‍वर महादेव प्राणप्रतिष्ठा महोत्सवास उद्यापासून प्रारंभ

Nashik : श्री सदगुरू ग्रुपतर्फे दिंडोरी रोडवरील आदित्य कुंज येथे राज्यातील सर्वात मोठ्या १२ फूट उंच अखंड नर्मदेश्‍वर महादेव शिवलिंगाची स्थापना करण्यात आली आहे.
Twelve feet unbroken Narmadeshwar Shivling
Twelve feet unbroken Narmadeshwar Shivlingesakal
Updated on

Nashik News : श्री सदगुरू ग्रुपतर्फे दिंडोरी रोडवरील आदित्य कुंज येथे राज्यातील सर्वात मोठ्या १२ फूट उंच अखंड नर्मदेश्‍वर महादेव शिवलिंगाची स्थापना करण्यात आली आहे. श्री राज राजेश्‍वर महादेव प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त सोमवार (ता. २६) पासून चार दिवसीय महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ()

महामंडलेश्वर मॉँ कनकेश्‍वरी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या सोहळ्यास नाशिककरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन श्री सदगुरू ग्रुपचे प्रफुल्लभाई ढोलकिया, भरतभाई ठक्कर, हेमराज पाटील शेवाळे आदींनी केले आहे. सोहळ्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी (ता. २६) सकाळी सात वाजता वेद मंगल चरण, ९ वाजता दीप प्रज्वलन व ध्वजारोहण, दुपारी चार वाजता परिसरात मंगल कलश यात्रा, सायंकाळी सहा वाजता जलाधिवास, साडेसहा वाजता आरती.

Twelve feet unbroken Narmadeshwar Shivling
Nashik News : थकबाकीदारांचा वीज पुरवठा होणार खंडित! पिंपळगाव महावितरणकडून वसुलीसाठी धडक मोहीम

मंगळवारी (ता. २७) ७ वाजता देवता पूजन, अग्निस्थापना व यज्ञ. बुधवारी (ता. २८) देवता पूजन, यज्ञ, कलश स्थापना, ध्वजारोहण व देवता प्रवेश विधी होईल. गुरुवारी (ता. ५) सकाळी ११. ३७ ला श्रींची प्राणप्रतिष्ठा, महापूजा, आरती व दुपारी एक वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

२१ फुटी त्रिशूळ

सदगुरू ग्रुपतर्फे उभारलेल्या या भव्य मंदिरात राज्यातील पहिल्याच बारा फुटी नर्मदेश्‍वर महादेवाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. शिवलिंगाचे वजनही बारा टन असल्याने हे मंदिर बारा ज्योतिर्लिंग स्वरूप असल्याचे विश्‍वस्त मंडळाने सांगितले. मंदिराची उंची पन्नास फूट असून हे काम नव्वद दिवसांत पूर्ण झाल्याचे श्री. ढोलकिया यांनी सांगितले. यावेळी विमल मोदी, जगदीश पोतदार आदी उपस्थित होते. (latest marathi news)

Twelve feet unbroken Narmadeshwar Shivling
Nashik News : ‘जातेगाव’ आरोग्य केंद्राला ‘कायाकल्प’ पुरस्कार; जिल्ह्यातील 32 आरोग्य केंद्रांना उत्तेजनार्थ पुरस्कार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.