NashiK News : नाशिक विमानसेवेचे पंख छाटू नका! खासदार राजाभाऊ वाजे आक्रमक; उड्डाण विभागाला विचारला जाब

NashiK News : लोकसभा निवडणूक संपताच नाशिकच्या विमानसेवेचे पंख छाटले जात असल्याने खासदार राजाभाऊ वाजे आक्रमक झाले आहेत.
Rajabhau Vaje demanded to increase flight service
Rajabhau Vaje demanded to increase flight serviceesakal
Updated on

NashiK News : लोकसभा निवडणूक संपताच नाशिकच्या विमानसेवेचे पंख छाटले जात असल्याने खासदार राजाभाऊ वाजे आक्रमक झाले आहेत. नागरी उड्डाण विभागाचे प्रमुख मोहोळ यांची भेट घेत विमानसेवेबद्दल त्यांनी जाब विचारला. नाशिकची विमानसेवा कमी न करता त्यात वाढ करण्याची मागणी केली. (Rajabhau Vaje demanded to increase flight service)

नाशिक विमानतळावरून इंडिगो विमान कंपनीच्या माध्यमातून अहमदाबादसाठी दोन विमानसेवा सुरू होत्या. तसेच नाशिक-नागपूर व नाशिक-गोवा ही विमानसेवादेखील इंडिगो कंपनीच्या माध्यमातून सुरू होती. मात्र काही राजकीय नेत्यांच्या दबावामुळे नाशिकच्या विमानसेवेतून अहमदाबादसाठी दोनऐवजी एकच सेवा सुरू ठेवण्यात आली असून, दुसरी सेवा औरंगाबादकडून वळविण्यात आली आहे.

नाशिक-नागपूर व नाशिक-गोवा या दोन विमानसेवा नाशिकहून आठवड्यातून तीन दिवस करण्यात आल्या असून, इतर दिवस त्या औरंगाबाद विमानतळाहून उड्डाण घेणार आहेत. त्यामुळे नाशिकच्या विमानसेवांवर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे. (latest marathi news)

Rajabhau Vaje demanded to increase flight service
Nashik Teacher Recruitment : शिक्षकांच्या कागदपत्रांची आज पडताळणी

नाशिक शहरामध्ये क्षमता असताना विमान कंपन्यांची येथून सेवा सुरू ठेवण्याची इच्छा असतानादेखील या विमानसेवा इतरत्र वळविल्या जात असल्याने नाशिककर नाराजी व्यक्त करीत आहेत. या गोष्टीचा पाठपुरावा करत लोकसभेच्या अधिवेशनादरम्यानच खासदार राजाभाऊ वाजे यांनी नागरी उड्डाण विभागाच्या मुख्यालयात जाऊन या याबाबत माहिती मागितली.

इतर शहरांना विमानसेवा सुरू करण्याबाबत कोणाचीच हरकत नसली तरी नाशिकहून सुरू असलेल्या विमानसेवा मात्र इतरत्र वळवू नयेत, अशी आग्रही मागणी त्यांनी नागरी उड्डाण विभागाचे मोहोळ यांच्याकडे केली. याबाबत तातडीने माहिती घेऊन सविस्तर अहवाल आपणास पाठविणार असल्याचेही मोहोळ यांनी खासदार वाजे यांना सांगितले.

Rajabhau Vaje demanded to increase flight service
Nashik News : नाशिकमधील महिला गुंतवणूकदारांच्या ‘एयूएम’मध्ये 5 वर्षांत 3.9 एक्स पटीने वाढ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.