Mango Crop : खडकाळ जमिनीवर बहरली केशर आंब्याची बाग!

Nashik News : खडकाळ जमिनीवर ४ एकरमध्ये कृषी योजनेच्या माध्यमातून ड्रीप योजना व मागेल त्याला शेततळ्यांचा लाभ घेऊन ड्रीप पद्धतीने केशर व राजापुरी आंब्याची लागवड केली आहे.
A successful experiment by farmer Eknath Bhor by growing a saffron mango orchard in 4 acres of rocky land at Janori.
A successful experiment by farmer Eknath Bhor by growing a saffron mango orchard in 4 acres of rocky land at Janori.esakal
Updated on

Nashik News : इगतपुरी तालुक्यातील जानोरी येथील एकनाथ भोर यांनी खडकाळ जमिनीवर ४ एकरमध्ये कृषी योजनेच्या माध्यमातून ड्रीप योजना व मागेल त्याला शेततळ्यांचा लाभ घेऊन ड्रीप पद्धतीने केशर व राजापुरी आंब्याची लागवड केली आहे. फळबाग लागवडीची आवड असल्याने व इतर भागांतील फळबागा पाहणी करुन व भेटीतून प्रेरित होऊन बायफ संस्थेकडून घेतलेल्या आंब्याच्या रोपांचे वृक्षात रूपांतर झाले आहे. (Rajapuri mangoes were planted on rocky land by taking advantage of drip scheme)

दादर येथे मध्य रेल्वेमध्ये लोको निरीक्षक पदावर काम केलेले भोर यांनी निवृत्तीनंतरही शेतीशी नाळ कायम जोडली असून, १७ वर्षांपासून हा प्रयोग उभा केला आहे. यासाठी शेणीतचे कृषी पदवीधर गोकुळ जाधव यांचे त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन मिळते. झाडाला सात वर्षांनी फळ येते.

फ्रुट मार्केटचे व्यापारी दिलीप मालुंजकर हे जागेवर येऊन आंबे घेऊन नाशिकला पाठवतात. १० बाय १२ अंतर ठेवले असून, १५:१५:१५ खते एकचवेळी द्यावी लागतात. यासाठी कल्टर नावाचे औषध फवारणी करतात. पत्नी मंदाबाई भोर, मुलगी मनीषा भोर कामात मदत करतात. (latest marathi news)

A successful experiment by farmer Eknath Bhor by growing a saffron mango orchard in 4 acres of rocky land at Janori.
Nashik Rural Police Recruitment: ग्रामीण पोलीस भरतीच्या धावण्याची चाचणी 19 पासून! भुजबळ नॉलेज सिटीतील वाहतूक मार्गात बदल

केशर व राजापुरीची बाराशे रुपयांप्रमाणे जाळी जाते. राजापुरीच्या एका झाडाला १० जाळ्या निघतात. तर केशरला सहा निघतात. यावर्षी या आंब्याची १७० जाळी विक्री झाल्याचे त्यांनी सांगितले.

‘मागेल त्याला शेततळे’ योजनेचा चांगला उपयोग झाला असून, तीस मीटर बाय तीस मीटर असलेल्या शेततळ्यातून ऊस व आंब्यांना पाणी वेळेवर मिळते. आठ एकरमध्ये लागवड केलेला उसदेखील अकोले येथील अगस्ती सहकारी साखर कारखान्याला जातो, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.

A successful experiment by farmer Eknath Bhor by growing a saffron mango orchard in 4 acres of rocky land at Janori.
Nashik News : मुंबईत खासदार वाजेंकडून शरद पवार यांचा सत्कार!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.