Ahilyabai Holkar Award : अहिल्याबाई होळकर पुरस्कार रखडले! मागील 4 वर्षांचे प्रस्ताव पुणे आयुक्तालयात धूळ खात पडून

Nashik News : राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारांचे २०२०-२१ पासून आजपर्यंत वितरण झाले नाही.
Ahilyabai Holkar Award
Ahilyabai Holkar Awardesakal
Updated on

Nashik News : राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारांचे २०२०-२१ पासून आजपर्यंत वितरण झाले नसून, या पुरस्कारासाठी राज्य सरकारला मुहूर्त सापडलेला नाही. गेल्या वर्षापासून जिल्हा कार्यालयांनी संबंधित सामाजिक संस्था- व्यक्तींचे पुरस्कारांचे शिफारशीसह पाठविलेले प्रस्ताव पुणे येथील महिला व बालविकास विभागाच्या आयुक्तालयात धूळ खात पडून आहेत. (Ahilyabai Holkar Award)

शासनाच्या महिला व बालविकास विभागांतर्गत महिला व बालविकास क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिला व संस्थांना दरवर्षी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. २०२० पासून आजपर्यंतचे पुरस्कार दिले गेले नाहीत. या पुरस्काराचे स्वरूप तीन टप्प्यांत असून राज्य, विभागीय आणि जिल्हास्तरीय पुरस्कार प्रदान केले जातात.

राज्यस्तरीय पुरस्कार एक लाख एक रुपये रोख, स्मृतिचिन्ह, सन्मानचिन्ह, विभागीय २५ हजार एक रुपये रोख, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी दहा हजार एक रुपये रोख, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र देण्यात येते. महिला व बालविकास आयुक्तालयाने एक वर्षापूर्वी मागविलेले प्रस्ताव अद्याप आयुक्तालयात पडून आहेत. (latest marathi news)

Ahilyabai Holkar Award
Nashik Vegetable Rate Hike : पालेभाज्यांची आवक 20 टक्क्यांवर; बाजारभाव वधारले

ते प्रस्ताव वर्षभर मंत्रालयात का पाठविण्यात आले नाहीत, याबाबत संबंधित पुरस्कारासाठी अर्ज केलेल्या व्यक्ती-संस्थांना प्रश्न पडला. महायुती सरकारचे अवघे तीनच महिने बाकी असून, या १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनापर्यंत तरी या पुरस्कारांची घोषणा होऊन पुरस्कारांचे वितरण व्हावे, अशी भावना या सामाजिक कार्य करणाऱ्या संस्था व व्यक्तींनी व्यक्त केली आहे.

"चार-चार वर्षे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर पुरस्कार रोखले जातात. याचा अर्थ सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्था आणि व्यक्तींची प्रशासन व उदासीन शासन एकप्रकारे थट्टाच करीत आहे, हे स्पष्ट होते." - रवींद्रकुमार जाधव, सामाजिक विश्लेषक

Ahilyabai Holkar Award
Nashik Police : मनोरुग्ण महिलेसाठी उपनगर पोलिसांकडून मानवतेचे दर्शन! उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.