मालेगाव : शहरात शिरखुर्मा तयार करण्यासाठी लागणाऱ्या काजू, बदाम, किसमिस, खोबरे, खजूर,चारोळी आदी साहित विक्री करणारी दुकाने लावायला सुरुवात झाली आहे. येथे शिरखुर्मा बनविण्यासाठी लागणाऱ्या सुत्तरफेणीची दुकाने ठिकठिकाणी लागत आहेत. तुप, मैदा, मजुरी यांच्या किंमती वाढल्याने गेल्या वर्षीपेक्षा यंदा सुतरफेणीच्या दरात २० रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे १६० रुपये किलोने सुत्तरफेणी विक्री होत आहे. (Nashik Ramadan Festival Malegaon Sutarfeni hit by inflation Rate increase by Rs 20 Demand from customers marathi news)
शहरात सुत्तरफेणी बनविण्याची लगबग रमाजानच्या पाच दिवसाअगोदर करण्यात आली. येथे ८ ते १० घाऊक ठिकाणी सुतरफेणी बनविली जात आहे. सुत्तरफेणी मैद्यापासून बनविली जाते. सुत्तरफेणीचा वापर शिरखुर्मामध्ये प्रामुख्याने वापर करताता. सुत्तरफेणीमुळे शिरखुर्म्याची चवही वाढते. सुत्तरफेणीमध्ये पांढरा, हिरवा, पिवळा, केशरी, लाल असे पाच रंग वापरतात. यामध्ये पांढऱ्या रंगाच्या फेणीला मागणी आहे. अनेकजण फेणीला साखरेच्या पाकमध्ये, दुधाबरोबर आवडीने खातात.
गेल्या वर्षी १४० रुपये किलोने मिळणारी सुत्तरफेणी महाग झाली आहे. तुप, मैदा, मजुरी वाढल्याने १६० रुपये किलोने मिळत आहे. रोज २ हजार किलो सुत्तरफेणी तयार केली जात आहे. महिनाभरात येथे ७० हजार किलोपेक्षा अधिक सुत्तरफेणी तयार होवून विकली जाते.
शहराबरोबर ग्रामीण भागातही सुत्तरफेणीला मागणी आहे. रमजान ईदनंतर मुस्लीम बांधवांच्या घरी महिनाभर शिरखुर्मा बनविण्याची लगबग असते.त्यामुळे सुत्तरफेणीच्या मागणीत दुप्पटीने वाढ होते. नाशिक, छत्रपती संभाजीनगर, कसमादे, येवला, धुळे, पिंपळनेर, अहमदनगर यासह विविध भागांमध्ये सुत्तरफेणीला मागणी आहे. (latest marathi news)
मालेगाव वगळता इतर ठिकाणी १८० ते २०० रुपये किलोने सुतरफेणी विक्री होते. कुसुंबा रोड, मोहम्मद अली रोड, सरदार मार्केट,भिक्कू चौक, चंदनपुरी गेट, आझादनगर, रजापुरा यासह विविध भागात सुत्तरफेणीची शेकडो दूकाने लागली आहे.
सुत्तरफेणी बनविण्यासाठी उत्तरप्रदेशचे कारागिर
सुत्तरफेणी बनविण्यासाठी प्रयागराज, कानपूर, लखनौ, उत्तर प्रदेश भागातील सुमारे ५० कारागिर दाखल झाले आहेत. महिनाभरापासून सुत्तरफेणी बनविण्याच्या कामाला वेगाने सुरुवात झाली आहे. एक कारागिर तासाला दहा किलो सुत्तरफेणी बनवितो. कारागिर ५० किलोला एक हजार रुपये मजूरी घेत आहे. या मजुरांची राहणे, खाण्याची व्यवस्था सुत्तरफेणी बनविणाऱ्या मालकाकडून केली आहे.
"सुत्तरफेणी बनविण्यासाठी दिवसेंदिवस लागणाऱ्या वस्तुंचे दर वाढत आहेत. शेवईचा कच्चा माल बनारस येथून येतो. तूप, मजुरी, स्पर्धा वाढत असल्याने कमी किंमतीत सुत्तरफेणी विकावी लागते."- अब्दुल रहेमान, सुत्तरफेणी घाऊक व्यापारी, मालेगाव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.