Rangpanchmi 2024 : रंगांची उधळण, रहाडींमध्ये डुबकी मारणे, शॉवरखाली भिजत डिजेच्या तालावर नाचताना तरुणांसह लहान अन् अबालवृद्धदेखील तल्लीन होतात. रंगपंचमीचा उत्सव साजरा करण्यासाठी शहरातील पारंपरिक रहाडी खुल्या करण्यात आल्या असून यासह आधुनिक शॉवर, ढोलताशे यासह डिजेची व्यवस्थाही करण्यात आली आहे. रंगपंचमीला नैसर्गिक रंगांची उधळण करण्यात येणार असून रंगोत्सव साजरा करण्यासाठी नाशिककर सज्ज झाले आहेत. (nashik Rangpanchami Nashikkar ready to burst with colours marathi news)
पहिली डुबकी रहाडीत
जल्लोष, उत्साह, नृत्य अन् आनंदात रंगांची उधळण करत नाशिककरांची पावले जुन्या नाशिकच्या दिशेने वळतात. आजही रंगपंचमीच्या उत्सवाला रहाडीमध्ये डुबकी प्रारंभ केला जातो. शहरात पेशवेकालीन रहाडी ५ रहाड सध्या कार्यान्वित आहेत. काझीपुरा येथील दंडे हनुमान मित्रमंडळाची रहाड, जुनी तांबट लेन येथील रहाड, मधली होळी येथील रहाड, दिल्ली दरवाजा अन् तिवंधा येथील रहाडी रंगकर्मींचा उत्साह द्विगुणित करण्यासाठी सज्ज करण्यात आल्या आहेत.
नैसर्गिक रंगाची उधळण
रंगपंचमीला रंगांची उधळण करतानाही काही उत्साहींकडून रासायनिक रंगांचा वापर केला जातो, यामुळे अनेकांना शारीरिक इजादेखील होते. यंदा विक्रेत्यांनी स्वतः रासायनिक रंगांची विक्री न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे यंदाच्या रंगोत्सवात नैसर्गिक रंगांची उधळण होणार आहे. मात्र तरीही काही महाभाग हे रासायनिक रंग खेळण्याचा प्रयत्न करतील त्यांना नागरिकांनीच अटकाव करायला हवा.
आकर्षक पिचकारी
रंगपंचमीच्या निमित्ताने बाजारात आकर्षक पिचकारी विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. एअर गन, बॅग स्टाइल, पाइप, स्मोक स्टील, बासरीच्या आकारातील, कार्टूनच्या पिचकाऱ्यांचे लहानांना आकर्षन आहे, तर रंगांची उधळण करण्यासाठी बाजारात दाखल झालेली प्रेशर टँक अनेक तरुणांनी विकत घेतल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली आहे. (latest marathi news)
कुटुंबासह खेळा रंग
रंगोत्सव साजरा करण्यासाठी तसेच रहाडींचा अनुभव घेण्यासाठी जुने नाशिक परिसरात जनसागर लोटतो. तरुणाईच्या उत्साहात या अलोट गर्दीमुळे महिला, लहान बालकांना चालायलाही जागा राहत नाही. \
मात्र यातून काही गैरप्रकार घडू नये, प्रत्येकाला आपल्या कुटुंबासह रंगपंचमीचा आनंद साजरा करता यावा यासाठी प्रशासनातर्फे सीसीटीव्हीची करडी नजर सर्वांवर असणार आहे. यातून इतरांना त्रास देणाऱ्या अति उत्साहींच्या वर्तनावर लक्ष ठेवण्यात येणार असल्याने नागरिकांनी सहकुटुंब रंगपंचमी उत्साहात साजरी करावी असे आवाहन करण्यात आले आहे.
सोसायट्यांमध्येही रंगपंचमीचे नियोजन
रंगांची उधळण करण्यासाठी शहरातील सोसायट्यामध्येही नियोजन करण्यात आले आहे. नैसर्गिक रंग, पाण्याचे शॉवर, म्युझिक सस्टिमचे, यासह स्नेहभोजन असे सर्व नियोजन करत सोसायटीत रंगपंचमीचा जल्लोष करण्यासाठी नागरिक सज्ज आहेत.
महिलांची रंगपंचमी
आपल्या मित्र परिवारासह रंगपंचमीचा उत्सव सर्वजण साजरा करतात. महिलांच्या विविध ग्रुपने मिळून मैत्रिणींची रंगपंचमी साजरी करण्यासाठी जय्यत तयारी केली आहे. विविध महिला मंडळांतर्फे रंगोत्सव साजरा करण्यासाठी नियोजन केले असून रंगांची उधळण करताना स्नेहभोजनाचेही आयोजन करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.