Rangpanchmi 2024 : रंगोत्सवासाठी विविध मंडळाकडून जय्यत तयारी

Rangpanchmi : दरवर्षीप्रमाणे यंदाही शहरात रहाडींची धूम रंगणार आहे. रहाडींसह रंगीत संगीत शॉवरची मजाही तरुणाईला घेता येणार आहे.
rahad
rahad esakal
Updated on

Rangpanchmi 2024 : दरवर्षीप्रमाणे यंदाही शहरात रहाडींची धूम रंगणार आहे. रहाडींसह रंगीत संगीत शॉवरची मजाही तरुणाईला घेता येणार आहे. शहराला पेशवेकालीन रहाडींची परंपरा असून तब्बल दीडशे ते दोनशे वर्षांची परंपरा असलेल्या अनेक रहाडी आहेत. कालौघात यातील काही रहाडी कायमस्वरूपी बंद झाल्या तरी अनेक रहाडींचे नव्याने पुनरुज्जीवित करण्यात आल्या आहेत. (nashik Rangpanchami Successful preparation by various troupes for Rangotsav marathi news)

यातमधली होळी तालीम संघाची रहाड तब्बल ऐंशी वर्षांच्या खंडानंतर खोदण्यात आली आहे. रहाडींशिवाय अनेक मंडळांनी शॉवरची व्यवस्था केली आहे. यात विनायक पांडे यांच्या मंडळासह अनेक मंडळे सक्रिय आहेत. दिल्ली दरवाजा येथील समस्त तुरेवाला मंडळ व आझाद सिद्धेश्‍वर मित्रमंडळाची रहाड यंदाही खोदण्यात आली आहे.

मानकरी माजी नगरसेवक शाहु खैरे व बेळे गुरुजींच्या हस्ते पूजन झाल्यावर दोन वाजता ही रहाड सुरू होईल, अशी माहिती अर्जुन करवल यांनी दिली. तिवंध्यातील हिंदमाता सेवक मंडळाच्या रहाडीस दीडशे वर्षांची परंपरा आहे. मयूर भालेराव मंडळाचे अध्यक्ष पप्पू संगमनेरकर सचिव आहे. (latest marathi news)

rahad
Loksabha Election 2024 : जे झाले ते बरोबर नाही,नाना पटोले ; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची सांगलीच्या जागेवरून नाराजी

दुपारी दोनला पूजेनंतर येथील रंगोत्सव सुरू होईल. पंचवटीतील शनी चौक मित्रमंडळाची रहाड यंदाही खोदण्यात येणार असून विधिवत पूजनानंतर दुपारी दोन वाजता येथील रंगोत्सव सुरू होईल, अशी माहिती मंडळाच्या कार्यकर्त्यांनी दिली. गजानन शेलार यांच्या मंडळाची रहाडही यंदा खोदण्यात येणार आहे.

महिलांना संधी देणारी रहाड

जुन्या नाशिकमधील तांबट लेन येथील रहाड काही कारणाने तब्बल चाळीस वर्षे बंदच होती. या रहाडीसाठी यंदा केशरी रंग असून दुपारी बारा वाजता विधिवत पूजन झाल्यावर धप्प्याला सुरवात होईल. महत्त्वाचे म्हणजे या रहाडीत खास महिला व मुलींसाठी स्वतंत्र वेळ ठेवण्यात आली आहे.

rahad
Daily Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 27 मार्च 2024

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.