Clean Air Survey : केंद्र सरकारतर्फे करण्यात आलेल्या स्वच्छ वायू सर्वेक्षण स्पर्धेत दहा लाखांपुढील लोकसंख्येच्या गटात १३१ महापालिकांमध्ये नाशिकचा क्रमांक देशात २१ व्या स्थानावर, तर राज्यात चौथ्या स्थानावर आला.
इंदूर देशात पहिली, तर महाराष्ट्रातील ठाणे महापालिका देशात तिसरी, राज्यात पहिली आली. गेल्या वर्षीपेक्षा यंदा सर्वेक्षणात नाशिकला २५ गुण अधिक मिळाले आहेत. (Nashik ranks 21st among 131 municipalities in Swachh Vayu Sarvekshan in country news)
केंद्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालयातर्फे पर्यावरणीय उपाययोजनेसाठी एन- कॅप अंतर्गत निधी दिला जातो. त्याच्या माध्यमातून हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी उपाययोजना करणे बंधनकारक आहे.
केंद्र सरकारकडून प्राप्त होणाऱ्या निधीचा उपयोग योग्य रीतीने होतो की नाही, याचा आढावा घेण्यासाठी स्वच्छ वायू सर्वेक्षण करण्यात आले होते. नाशिक महापालिकेला देशपातळीवर १६० गुण मिळाले. गेल्या वर्षी १३८ गुण मिळाले होते.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
या सर्वेक्षणासाठी असलेल्या निकषात शहरातील स्वच्छ हवा, हवेतील प्रदूषित घटके, हवेतील व रस्त्यावरील धूळ, बांधकाम साहित्याची विल्हेवाट, बांधकाम सुरू असलेल्या इमारतींना ग्रीन जाळी, वाहनांच्या धुराचे प्रमाण, वाहनांचे पीयूसी प्रमाणपत्र, वीटभट्ट्या व चिमण्यांचे प्रदूषण आदींचा समावेश होता.
"गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा २५ गुण अधिक मिळाले आहेत. त्यामुळे नाशिक महापालिकेने देशात २१ वा क्रमांक मिळविला, तर राज्यात चौथ्या स्थानावर आहे. पुढील वर्षी आणखी प्रगती करू." - विजयकुमार मुंढे, उपायुक्त, पर्यावरण विभाग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.