Nashik Marigold Rates Hike: झेंडूच्या फुलांचे कॅरेट @500 रुपये! लग्नसराई, उन्हाच्या तडाख्याचा परिणाम

Nashik News : सध्या लग्नसराई सुरू असल्याने सर्वच प्रकारच्या फुलांच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे.
Marigold
Marigold esakal
Updated on

Nashik Marigold Rates Hike : सध्या लग्नसराई सुरू असल्याने सर्वच प्रकारच्या फुलांच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. त्यातच कडक उन्हामुळे फुले टिकाव धरत नसल्याने मोठी मागणी असलेल्या झेंडूच्या एका कॅरेटसाठी चक्क पाचशे रुपये मोजावे लागत आहे. याशिवाय गुलाबसह शेवंती, गुलछडी, अस्टर, बिजली या फुलांच्या आवकेतही निम्म्‍याही घट झाल्याने दरांत जवळपास दुपटीने वाढ झाली आहे. (Nashik Rate Hike Chart of Marigold Flowers 500 news)

गुलशनाबाद अशी ओळख असलेल्या नाशकात पेशवेकाळाच्या पूर्वीपासून मठ-मंदिरांचे शहर अशी ओळख मिळालेली आहे. त्यामुळे फुलांच्या बाजारालाही जुना इतिहास आहे. पूर्वी हा बाजार सराफ बाजारात भरत असे. परंतु सराफ व्यावसायिक व फूल विक्रेत्यात या बाजारावरून बरेच दिवस संघर्ष सुरू होता.

तत्कालीन पालकमंत्री व ज्येष्ठ नेते राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांच्या पुढाकारातून हा बाजार गणेशवाडीतील भाजी मंडई शेजारी भरू लागला. सुरवातीला फारसा प्रतिसाद नसला तरी आता हा बाजार चांगलाच फोफावला आहे. जिल्ह्यासह बाहेरूनच याठिकाणी फूल उत्पादक व विक्रेते विक्रीसाठी येतात.

सणावाराला तर येथील उलाढाल दुप्पट, तिप्पट होते. सध्या लग्नसराई सुरू आहे. त्यामुळे झेंडु, गुलाबसह अन्य काही फुलांच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. मात्र मागणीच्या तुलनेत पुरवठा नसल्याने दरांत दुप्पट वाढ झाली आहे. लग्नसराईबरोबरबरच काढणीसह वाहतूक खर्चातही वाढ झाल्याचे फूल उत्पादक सांगतात. याचा परिणाम दर चक्क दुप्पट झाल्याचे बाजारात फेरफटका मारला असता दिसून आले. (latest marathi news)

Marigold
Nashik News : स्वामी समर्थांच्या पादुका 29 ला शहरात! विविध धार्मिक कार्यक्रम; भाविकांना मिळणार दर्शन

बेलाचा वाटा ५० रुपये

भगवान शिवशंकराला बेलाच्या पानांची आवड असल्याने बेलाच्या पानांना वर्षभर मागणी असते. तरीही सर्वसाधारण दहा रूपयांत बेलाच्या पानांचा वाटा मिळतो. परंतु महाशिवरात्रीपासून बेलाच्या पानांचा वाटा पन्नास रुपयांवर पोचला आहे. तुकडा गुलाबाचे कॅरेट एरवी शंभर रुपयांत मिळते, त्याची किंमतही चारशे ते पाचशे रुपये जाळीपर्यंत पोचले आहे.

फुलांचे सर्वसाधारण दर -

झेंडू कॅरेट - ४५० ते ५०० रु.

गुलाब - २५ ते ४० रु. जुडी (१० फुले)

शेवंती - २०० ते २५० रु. किलो

अस्टर - १६० ते १८० रु. किलो.

बिजली - १५० ते १६० रू. किलो.

गुलछडी - २०० रु. किलो.

"उन्हामुळे फुलांच्या आवकेत घट झाली आहे, परंतु लग्नसराई, सण उत्सवांमुळे सर्वच फुलांच्या मागणीत मोठी वाढ झाल्याने पुढील काळात फुलांच्या दरांत पुढील काळातही तेजीच राहण्याची शक्यता आहे."- कल्पेश रासकर, फूल व्यापारी

Marigold
Nashik News : व्हॅन, बस चालकांना 2 तासांचे प्रशिक्षण बंधनकारक! RTOकडे परवाना नुतनीकरणावेळी द्यावे लागणार प्रमाणपत्र

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.