Nashik : रविवार कारंजा, बोहरपट्टी कॉर्नरला वाहनांचा गराडा! त्रस्त नागरिकांना वाहतूक कोंडीमुळे पायी चालणेही झाले जिकरीचे

Latest Nashik News : बऱ्याचदा रिक्षाचालक आणि अन्य वाहनधारकांमध्ये धक्का लागल्याच्या कारणातून वाद होतात. विशेष म्हणजे वाहतूक पोलिसांच्या उपस्थितीतही असे प्रकार घडतात. यामुळे सामान्य नागरिक त्रस्त होत आहेत.
Vehicles parked at Boharpatti corner.
Vehicles parked at Boharpatti corner.esakal
Updated on

जुने नाशिक : रविवार कारंजा आणि बोहरपट्टी कॉर्नर येथील अनधिकृत रिक्षा थांब्यासह इतर वाहने पार्क करून संपूर्ण परिसरास गराडा घातला जातो. यामुळे शहरात तसेच मेन रोडकडे जाणाऱ्या मार्गास अडचण निर्माण होऊन वाहतूक कोंडी होते. बऱ्याचदा रिक्षाचालक आणि अन्य वाहनधारकांमध्ये धक्का लागल्याच्या कारणातून वाद होतात. विशेष म्हणजे वाहतूक पोलिसांच्या उपस्थितीतही असे प्रकार घडतात. यामुळे सामान्य नागरिक त्रस्त होत आहेत. (raviwar karanja Boharpatti corner of vehicles blocked roads)

रविवार कारंजा आणि मेन रोड शहरातील मुख्य बाजारपेठ आहे. इतकेच नाही तर शहराच्या विविध ठिकाणी जाण्यासाठी रविवार कारंजा भागातूनच मार्गक्रमण करावे लागते. प्रसिद्ध चांदीचा गणपतीचे मंदिर येथे आहे. शेकडो भाविक दररोज दर्शनासाठी येथे येतात.

बाजारपेठेतील व्यापारीही दर्शन घेऊन व्यवसायात सुरवात करतात. तर काही भाविकांची दिवसाची सुरवातच येथील दर्शनाने होते. त्यामुळे रविवार कारंजा आणि बोहरपट्टी कॉर्नर नेहमीच गजबजलेला असतो. असे असताना बहुतांश रिक्षाचालकांसह मंदिर परिसरासह बोहरपट्टी कॉर्नर भागात अनधिकृत रिक्षा थांबा तर अन्य वाहनचालकांची पार्कींग तसेच रस्त्यावरील व्यावसायिकांचा गराडा आहे.

वाहतूक पोलिस काही ठराविक वेळेतच परिसरात आढळत असल्याने वाहनचालक मनमानी करत भरस्त्यात थांबून रहदारीस अडचण निर्माण करतात. यामुळे बाजारात येणाऱ्या नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागते. (latest marathi news)

Vehicles parked at Boharpatti corner.
Sharad Pawar: इंदापूरचा भावी आमदार कोण? शरद पवार याचं सूचक विधान

हटकल्यास मारहाण

रस्त्याच्या मधोमध रिक्षा उभ्या केल्या जातात. त्याचठिकाणी प्रवासी सोडून नवीन प्रवासी भरले जातात. त्यामुळे रस्ता अरुंद होऊन पायी चालणेही अवघड होते. शहर वाहतूक बस तसेच अन्य वाहने त्या भागातून मार्गक्रमण करत असताना मोठी अडचण निर्माण होते.

दिवसभर वाहतूक कोंडी असते. त्यातून किरकोळ अपघात होऊन वादाच्या घटना घडतात. अडथळा करणाऱ्यांना कुणी हटकल्यास वाद घालत मारहाण केली जाते. मेन रोडला येणाऱ्या-जाणाऱ्या तरुणींची छेडखानीचे प्रकार घडतात, असे सांगण्यात आले.

नागरिकांच्या मागण्या अशा

कायमस्वरूपी आणि दिवसभर वाहतूक पोलिसांची नियुक्ती करावी, अनधिकृत रिक्षा थांबा हटवावा, रविवार कारंजा आणि बोहरपट्टी कॉर्नर वाहनमुक्त परिसर करावा, अशा मागण्या नागरिकांकडून होत आहेत.

Vehicles parked at Boharpatti corner.
Nilesh Lanke: फोटो काढण्यासाठी थांबवलं अन्...निलेश लंकेंनी कशी करुन दिली अमित शाहांना नवीन खासदारांची ओळख? वाचा मजेदार किस्सा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.