Nashik PESA Bharti : पेसा भरतीतील उमेदवारांना न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून नियुक्ती मिळावी, या मागणीसाठी माजी आमदार जे. पी. गावित यांसह उमेदवारांनी केलेल्या उपोषणाची दखल घेत राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्रक सादर करणार असल्याची माहिती दिली. त्यानुसार शासनाने सर्व संबंधित विभागांकडून पेसा क्षेत्रातील भरतीबाबतची आकडेवारी मागविली. त्यासाठी आदिवासी विकास विभागासह जिल्हा परिषदेत माहितीची जुळवाजुळव करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे. (Reconciliation of statistics in PESA sector)