Nashik Tax Recovery : 3 महिन्यात मालमत्ता कराची विक्रमी वसुली; करसवलत योजनेमुळे महापालिकेला लाभ

Nashik News : मागील तीन महिन्यात मालमत्ता कराच्या वसुलीत विक्रमी वाढ झाली असून, शंभर कोटीची वसुली झाली.
NMC Nashik
NMC Nashik esakal
Updated on

Nashik News : मागील तीन महिन्यात मालमत्ता कराच्या वसुलीत विक्रमी वाढ झाली असून, शंभर कोटीची वसुली झाली आहेत. परंतु एकीकडे मालमत्ता कर वसुलीचे ढोल बडविले जात असताना पाणीपट्टीत मात्र कर विभागाने मार खाल्ला असून, अवघे जवळपास नऊ कोटी रुपये वसुली झाली आहे. महापालिकेच्या उत्पन्नाचा दुसऱ्या क्रमांकाचा स्रोत मालमत्ता करवसुली आहे. (Nashik Record collection of property tax in 3 months)

मनुष्यबळ नसल्याने घर व पाणीपट्टीचे उद्दिष्ट पुरे होत नव्हते. त्यामुळे २०१६ पासून महापालिका क्षेत्रात त्रिस्तरीय कर सवलत योजना सुरू करण्यात आली. यामध्ये एप्रिल महिन्यात एकरकमी घरपट्टी अदा केल्यास ८ टक्के, मे महिन्यात ५, तर जून महिन्यात ३ टक्के सवलत दिली जाते. सौरऊर्जा तसेच इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग स्टेशन उभारल्यास त्यातदेखील सवलत आहे.

ऑनलाइन भरणा केल्यानंतरदेखील महापालिकेकडून मालमत्ता करात सवलत आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता मार्च महिन्यात सुरू झाली. त्यापूर्वीपासून म्हणजे जानेवारीपासून निवडणुकीच्या कामकाजासाठी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. वास्तविक कर वसूल करण्यासाठी जेमतेम ८० कर्मचारी असतानादेखील घरपट्टी विभागातील सर्व कर्मचारी निवडणूक कामासाठी वर्ग करण्यात आले.

त्यामुळे कर वसुली होईल की नाही, याबाबत साशंकता होती. परंतु कर सवलत योजना लागू असल्यामुळे महापालिकेला त्याचा लाभ मिळाला. सवलत योजनेतून १ एप्रिल ते २६ जून या कालावधीमध्ये महापालिकेला शंभर कोटी ६६ लाख रुपये महसूल प्राप्त झाला. मागील वर्षी एप्रिल ते घेऊन या कालावधीमध्ये ८६ कोटी २६ लाख रुपये महसूल प्राप्त झाला होता. (latest marathi news)

NMC Nashik
Nashik News : सहाय्यक आयुक्त पत्की 'यूएन'च्या स्पेशल फोर्समध्ये महाराष्ट्र पोलिस दलातील पहिल्या महिला अधिकारी

त्यामुळे मागील वर्षाच्या तुलनेत यंदा मनुष्यबळ अपुरे असूनही १४ कोटी ३९ लाख रुपयांचा महसूल मिळाला. पाणीपट्टीत मात्र अपेक्षित उद्दिष्ट गाठता आले नाही. पाणीपट्टीसाठी सवलत योजना नव्हती व देयकांचे वाटपदेखील झाले नव्हते. त्यामुळे वसुलीवर त्याचा परिणाम झाला. १ एप्रिल ते २६ जून या कालावधीमध्ये ८ कोटी ८६ लाख १७ हजार १२० रुपये पाणीपट्टीतून मिळाले.

मागील वर्षाच्या तुलनेत एक कोटी ८१ लाख रुपये महसूल कमी प्राप्त झाला. दरम्यान सवलत योजनेचे शेवटचे तीन दिवस असून नागरिकांनी सवलत योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कर उपायुक्त विवेक भदाणे यांनी केले आहे.

विभागनिहाय प्राप्त मालमत्ता कर (कोटी रुपयात)

विभाग वसुली

सातपूर १२.११

पश्चिम १९.२०

पूर्व १६

पंचवटी १८.७९

सिडको २०.८७

नाशिक रोड १३.६६

------------------------

एकूण १००.६६

NMC Nashik
Pune Nashik Highway : ‘राँग साइड’ तरीही सुसाट! पुणे-नाशिक महामार्गावरील स्थिती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com