नाशिक : विधानसभा निवडणुकीत मतदारांनी कमालीचा उत्साह दाखविल्याने जिल्ह्यात विक्रमी मतदानाची नोंद झाली आहे. मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर २००९ पासून झालेल्या चार निवडणुकांमध्ये जिल्ह्यात सर्वाधिक मतदान चालू विधानसभा निवडणुकीत नोंदविण्यात आले आहे. नाशिक जिल्ह्यात एकूण १५ विधानसभा मतदारसंघ असून, येथे ५० लाख ६१ हजार मतदार आहेत. महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर १९६२ मध्ये पहिल्यांदा निवडणूक पार पडली.