Nashik Winter Update: शहरात गारठा टिकून असून, नागरिकांना थंडीची अनुभूती येते आहे. शुक्रवारी (ता.८) नाशिकचे किमान तापमान १५.४ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. कमाल तापमान २९.५ अंश सेल्सिअस राहिले. (Nashik recorded minimum temperature of 15.4 degrees Celsius news)
गेल्या काही दिवसांपासून वातावरणात निर्माण झालेला गारवा टिकून राहिला आहे. दिवसभरातील काही वेळ ढगाळ वातावरण राहात आहे. तर उर्वरित दिवसभर सूर्याची सौम्य किरणे नाशिककरांना अल्लाददायक अनुभूती करून देत आहे.
पहाटेच्या वेळी वातावरणात धुके उद्भवते आहे. तर मध्यरात्री उशिरा वाऱ्यामुळे गारठ्याची तीव्रता अधिकप्रमाणात जाणवते आहे. सध्या गारठा टिकून असून, येत्या काही दिवसांत तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.