Nashik News : कला शिक्षकांची भरती करा! मुख्यमंत्र्यांना साकडे

Nashik News : राज्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या आवडीचा चित्रकला विषय शिकवण्यासाठी कलाशिक्षक नाहीत हे खेदाची बाब आहे.
Dattatray Sangle, District President of Art Teachers' Federation while giving a statement to the Chief Minister
Dattatray Sangle, District President of Art Teachers' Federation while giving a statement to the Chief Ministeresakal
Updated on

Nashik News : कला शिक्षकांची भरती करा अशी मागणी महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक महासंघाच्या वतीने नाशिक येथे आयोजित केलेल्या संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक संवाद मेळाव्या दरम्यान शिक्षक संघाचे जिल्हा अध्यक्ष दत्तात्रय सांगळे, सचिन पगार, विभागीय अध्यक्ष राजेंद्र लोखंडे, यांनी कलाशिक्षक महासंघाच्या वतीने निवेदन देऊन मागणी केली आहे. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकार यांना निवेदन पाठविण्यात आले आहे.(Recruit Art Teachers)

निवेदनात म्हटले आहे की...

राज्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या आवडीचा चित्रकला विषय शिकवण्यासाठी कलाशिक्षक नाहीत हे खेदाची बाब आहे. या करिता राज्यातील कलाशिक्षकांची पदभरती बाबत तात्काळ निर्णय घेऊन पवित्र पोर्टल मध्ये कला शिक्षकांचे पदक भरती करणे बाबत सोय करून देण्यात यावी.

राज्यातील सर्व शासनमान्य खाजगी अनुदानित प्राथमिक माध्यमिक आश्रम शाळा येथे प्रत्येकी एक कला शिक्षकाची पदभरती स्वतंत्र करण्यात यावी, जर या जागेवर डी. एड. किंवा बी. एड. इतर शैक्षणिक अहर्ताचे सामान्य शिक्षक भरती केल्यास त्यास मान्यता प्रदान करण्यात येऊ नये. (latest marathi news)

Dattatray Sangle, District President of Art Teachers' Federation while giving a statement to the Chief Minister
Nashik CM Shinde Daura : लवकरच शेतकऱ्यांचा हिताचा निर्णय : एकनाथ शिंदे

कलाशिक्षकांचे पवित्र पोर्टलमध्ये समावेश नसल्याने आवश्यक असलेल्या कलाशिक्षक संस्थेच्या ठरावाने पदभरती करण्यात यावी. संच मान्यता मध्ये कार्यरत कलाशिक्षकांच्या विशेषपद पूर्वीप्रमाणे स्वतंत्र दाखवण्यात यावे.

इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत शालेय अभ्यासक्रमात कला कार्यानुभव विषय आवश्यक असल्याने त्याचे अध्यापन सक्षम शैक्षणिक अहर्ता प्राप्त एटीडी किंवा ए. टी. डी. ए. एम्. शिक्षक करू शकतात त्यांची पदभरती होणे गरजेचे असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होता कामा नये. या अनुषंगाने कला शिक्षकांची भरती करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य कला शिक्षक संघ सर्व जिल्ह्यातील कलाशिक्षक यांनी केली आहे.

Dattatray Sangle, District President of Art Teachers' Federation while giving a statement to the Chief Minister
Nashik Division Teachers Constituency Election: शिक्षक, शिक्षण अन शिक्षणसंस्थांना न्याय देणार : ॲड. संदीप गोपाळराव गुळवे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.