NMC Recruitment : महापालिकेत तात्पुरत्या स्वरूपात रिक्तपदांची भरती

NMC Recruitment : महापालिकेत रिक्त असलेले एकूण पदांपैकी पाच टक्के पदे हे तात्पुरत्या स्वरूपात भरण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.
NMC Recruitment
NMC Recruitmentesakal
Updated on

NMC Recruitment : राज्य शासनाने नुकत्याच केलेल्या लोककल्याणकारी घोषणांची अंमलबजावणी करण्यासाठी महापालिकेत रिक्त असलेले एकूण पदांपैकी पाच टक्के पदे हे तात्पुरत्या स्वरूपात भरण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. राज्य शासनाच्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना (लाडका भाऊ) अंमलबजावणीसाठी राज्य शासनाने राज्यातील सर्व महापालिकांना एकूण रिक्त पदांच्या पाच टक्के पदे भरण्यास मंजुरी दिली आहे. ( Recruitment of vacancies in Municipal Corporation on temporary basis )

या योजनेतंर्गत तरुणांना प्रशिक्षणार्थी म्हणून काम करावे लागणार आहेत. तांत्रिक व अतांत्रिक पदावर काम करण्याची देखील संधी बेरोजगार तरुणांना या निमित्ताने मिळणार आहे. महापालिका प्रशासन उपायुक्त श्रीकांत पवार यांनी या संदर्भात सर्व विभाग प्रमुखांची बुधवारी (ता. २४) बैठक घेतली. नाशिक महापालिकेत जवळपास २८०० पदे रिक्त आहेत. या तांत्रिक संवर्गातील रिक्त पदांची संख्या अधिक आहे. (latest marathi news)

NMC Recruitment
NMC Recruitment: डिसेंबरअखेर वैद्यकीय, अग्निशमनची भरती; महापालिका आयुक्तांचे निर्देश

२००३ नंतर महापालिकेत भरती झालेली नाही. त्यामुळे आता ‘लाडका भाऊ’ योजनेच्या माध्यमातून का होईना रिक्त पदे भरण्यास त्यांना मिळाली आहे. प्रशासनाकडून महापालिकेतील ३७ विभागांकडून आवश्‍यक असलेल्या मनुष्यबळांची यादी मागविण्यात आली आहे. दरम्यान राज्य शासनाकडे जवळपास ९ हजार पदांचा नवीन आकृतिबंध मंजुरीसाठी सादर करण्यात आलेला आहे. त्याला अद्यापपर्यंत मंजुरी मिळालेली नाही.

तात्पुरत्या स्वरूपात प्रशिक्षणार्थीपदे भरण्यास मंजुरी देण्यात आली असली तरी नव्याने निघणाऱ्या रिक्त पदांच्या जागी तात्पुरत्या स्वरूपात भरण्यात आलेली पदे समाविष्ट करता येणार नाही. हे उलट राज्य शासनाने वाहन चालक वगळता सर्व पदे राज्य लोकसेवा आयोगामार्फत भरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लाडका भाऊ योजनेअंतर्गत भरली जाणारी पदे तात्पुरत्या स्वरूपातच राहणार आहे.

NMC Recruitment
NMC Recruitment : रिक्तपदे भरतीसाठी निवड समिती गठित!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com