नाशिक : जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून परतीच्या पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. बुधवारी (ता. २४) दिवसभर जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे १३ धरणांमधून विसर्ग पुन्हा सुरू झाला आहे. त्यामुळे गोदावरी नदीला पुराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. यंदा जास्त पाऊस झाला असला तरी एकूण पावसापेक्षा त्याचे प्रमाण सात टक्के इतके कमी आहे. या पावसाने सोयाबीन, कांदा, मक्यासह खरिपाच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. ठिकठिकाणी घरांची पडझड झालेली आहे. काही ठिकाणी ढगफुटीसारखा पाऊस झालेला आहे. (red alert Heavy rain in district release from 13 dams )
ग्रामीण भागात सोमवार (ता. २३)पासून सुरू झालेला पाऊस गुरुवारीही कायम राहिला. दिवसभरात ३४ टक्के पावसाची नोंद झाली. दुपारी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला असून, दोन दिवस पाऊस जोरात पडणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. दुसरीकडे शहराला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण ९७ टक्के भरले असून, इतर १२ धरणांमधून विसर्ग करण्यात येतो आहे. चार दिवसांपूर्वी केवळ पाच धरणांमधून सुरू असलेला विसर्ग पुन्हा वाढला. जायकवाडीकडे पाणी वाहू लागले आहे.
जिल्ह्याचे पर्जन्यमान ९३३.८ इतके असून, त्यांपैकी जून ते सप्टेंबरअखेरपर्यंत ९२.३ टक्के इतका पाऊस नोंदविण्यात आला आहे. जिल्ह्यात परतीच्या पावसाने सर्वदूर हजेरी लावली आहे. त्यात गुरुवारी सकाळी अकरापर्यंत (ता. २६) मालेगाव १८.६, बागलाण १६, कळवण १८.२, नांदगाव १८.१, सुरगाणा २१.५, नाशिक १९.५, दिंडोरी १५.६, इगतपुरी २८.६, पेठ १३.६, निफाड ११.७, सिन्नर ३७.८, येवला ४१.६, चांदवड ८.२, त्र्यंबकेश्वर २१.२, देवळा ३३.६ इतक्या पावसाची नोंद झाली आहे.
झेंडूच्या फुलांचे नुकसान
नवरात्रोत्सवात झेंडूच्या फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. याचा अंदाज घेऊन शेतकऱ्यांनी लावलेल्या झेंडूच्या फुलांना पावसाचा तडाखा बसला आहे. तसेच, लाल कांद्याची लागवड सुरू असल्याने पावसाचा व्यत्यय निर्माण होत आहे, तर सिन्नरसह मालेगाव आणि दिंडोरी तालुक्यात घरांची पडझड झाली. (latest marathi news)
सोयाबीन, मका पिकाचे नुकसान
ओझर परिसरात दुपारी तीनच्या सुमारास ढगफुटीसदृश पाऊस झाला, तर पिंपळगाव बसवंत, सिन्नर तालुक्यातील अनेक गावांना चांगलेच झोडपून काढले. या पावसामुळे द्राक्षबागांच्या गोडाबारच्या छाटण्यांवर परिणाम होणार असून, टोमॅटो, सोयाबीन, मका पिकाचे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. येवल्यात ३५ वर घरे व दुकानांत पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले.
शाळांना सुटी नाही
हवामान विभागाने जिल्ह्याला रेड अलर्ट जारी केला. तरी शुक्रवारी (ता. २७) शाळांना सुटी देण्याबाबत जिल्हा प्रशासनाने कुठलाही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे शाळांना सुटी राहणार नाही.
धरणांमधून पुन्हा विसर्ग (क्यूसेक)
दारणा ३,६१२, कडवा ६,६४०, भाम ५६०, वालदेवी ३०, आळंदी ३०, भावली १३५, गंगापूर १,१६९, होळकर पूल १,१००, वाघाड १७८, वाकी ४६४, नांदूरमध्यमेश्वर ८,९३८, कश्यपी ६४०, करंजवण ३०१ असा विसर्ग सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.