Nashik Adivasi Morcha : ...अन्यथा पुन्हा मुंबईत लाँग मार्च! ‘लाल वादळा’चा ठिय्या कायम

Adivasi Morcha : वनजमिनीच्या मागणीसह अन्य १६ मागण्यांसाठी सोमवार (ता. २६)पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मांडलेल्या ‘लाल वादळा’ने सरकारला आता तीन दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे.
Former MLA Jiva Pandu Gavit while interacting with the protestors who were protesting for the third day outside the collector's office.
Former MLA Jiva Pandu Gavit while interacting with the protestors who were protesting for the third day outside the collector's office.esakal
Updated on

Nashik Adivasi Morcha : वनजमिनीच्या मागणीसह अन्य १६ मागण्यांसाठी सोमवार (ता. २६)पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मांडलेल्या ‘लाल वादळा’ने सरकारला आता तीन दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. येत्या शनिवार (ता. २)पर्यंत सरकारने आंदोलकांच्या मागण्यांबाबत निर्णय न घेतल्यास पुन्हा ‘मुंबईला लाँग मार्च’ काढण्याचा इशारा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार जिवा पांडू गावित यांनी दिला. (nashik Red Storm of adivasi protest marathi news)

त्यामुळे आंदोलकांचा रस्त्यावरील मुक्काम दिवसेंदिवस वाढत आहे. शेतकरी व कष्टकरी कामगारांच्या विविध मागण्यांसाठी ‘माकप’ व किसान सभेने सुरू केलेल्या आंदोलनानंतर तोडग्यासाठी मुंबईत वनहक्क अंमलबजावणी समितीचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित, पालकमंत्री दादा भुसे यांची बैठक झाली.

शिष्टमंडळात माजी आमदार जिवा पांडू गावित, डॉ. डी. एल. कराड व त्यांचे सहकारी उपस्थति होते. पण मंत्र्यांनी फक्त आश्वासनेच दिली. प्रत्यक्ष कृती दिसून न आल्यामुळे आंदोलकांनी येथून माघार घेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील महामुक्काम आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला.

गावित यांनी बुधवारी (ता. २८) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पाण्याच्या टँकरवर चढून संवाद साधला. आपण सरकारला तीन दिवसांचा वेळ देत आहोत. या काळात त्यांनी आपल्या मागण्यांबाबत शासन निर्णय पारित करण्याचे आवाहन केले. अन्यथा, पुढील काळात शासनाशी चर्चा बंद करून थेट मुंबईला जाण्याची तयारी ठेवली पाहिजे. त्यासाठी तालुकानिहाय नियुक्त सचिवांवर जबाबदारी निश्चित केल्याचे त्यांनी सांगितले. (latest marathi news)

Former MLA Jiva Pandu Gavit while interacting with the protestors who were protesting for the third day outside the collector's office.
Nashik Adivasi Morcha : ‘आदिवासीं’च्या मोर्चाने स्मार्ट रोड जाम! अशोकस्तंभ येथे वाहतूक कोंडी

शनिवारपर्यंत सरकारने निर्णय घेतला नाही, तर पुढे बेमुदत उपोषण सुरू करू, जेलभरो आंदोलन किंवा मुंबईचा मार्ग धरू, यासाठी तुमची तयारी आहे का, असा प्रश्न आंदोलकांना विचारला. यावर आंदोलकांनी हात उंचावून होकार दर्शवला. डॉ. कराड यांनीही केंद्र सरकारच्या भांडवलशाही धोरणावर कडाडून टीका केली. तसेच मुंबईपर्यंत धडक मारण्याची तयारीही दर्शवली.

शिस्तीचे पालन करा

गावावरून आपण आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी इथपर्यंत आलो आहोत. नाशिकदर्शन किंवा फिरायला आलेलो नाहीत. याचे भान ठेवून प्रत्येक आंदोलकाने शिस्तीचे पालन केले पाहिजे.

कुणीही मद्यप्राशन करून आंदोलनात सहभागी होणार नाही, याची काळजी प्रत्येक तालुक्याने घ्यावी, अशा कडक शब्दांत माजी आमदार गावित यांनी सूचना दिल्या. इतकेच नव्हे, तर कुणीही शिस्त पाळत नसेल तर त्यांची नावे आमच्याकडे द्या, त्यांना आम्ही घरी काढून देऊ. ज्यांना आंदोलनात थांबायचे नसेल, त्यांनी आत्ताच निघून गेले तरी चालेल, असेही त्यांनी सुनावले.

Former MLA Jiva Pandu Gavit while interacting with the protestors who were protesting for the third day outside the collector's office.
Nashik Adivasi Morcha: आंदोलनात आलेल्या एकाचा दुर्दैवी मृत्यु; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आली चक्कर

‘स्मार्ट रस्त्यावर’ कोंडी कायम

जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील ‘स्मार्ट’ रस्त्यावर आंदोलकांनी ठिय्या मांडल्यामुळे सीबीएस ते अशोक स्तंभापर्यंतचा रस्ता वाहुतकीसाठी बंद आहे. आंदोलकांनी रस्त्याच्या एका बाजूला वाहने उभी केली आहेत.

त्यातच त्यांचे सर्व साहित्य ठेवलेले असल्यामुळे याच गाड्यांशेजारी सकाळी व सायंकाळी चूल पेटते. रस्त्यावरच पंगती उठतात. पुढील दोन दिवस पुरेल एवढीच रसद सध्या शिल्लक आहे. त्यामुळे अजून कुमक व रसद मागविण्याच्या सूचना दिल्याचे आंदोलकांनी सांगितले.

आंदोलकांनी सुचवले तीन पर्याय

-शनिवार (ता. २) पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या कायम

- त्यानंतर जेलभरो किंवा बेमुदत उपोषणाची घोषणा

- अंतिम पर्याय म्हणून पुन्हा मुंबईत लाँग मार्च काढणार

Former MLA Jiva Pandu Gavit while interacting with the protestors who were protesting for the third day outside the collector's office.
Nashik Adivasi Morcha : सलग दुसऱ्या दिवशी स्मार्टरोड दुतर्फा बंद; पोलिसांशी कटकट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.