Nashik Voter Registration : 3 दिवसात एक हजार नवमतदारांची नोंदणी

Voter Registration : सरकारच्या मतदार यादी विशेष पुनर्परीक्षण मोहीम अंतर्गत काँग्रेस पक्षातर्फे जुने नाशिक परिसरात नवमतदार नोंदणी सुरू आहे.
Crowd of new voters for voter registration.
Crowd of new voters for voter registration.esakal
Updated on

Nashik Voter Registration : सरकारच्या मतदार यादी विशेष पुनर्परीक्षण मोहीम अंतर्गत काँग्रेस पक्षातर्फे जुने नाशिक परिसरात नवमतदार नोंदणी सुरू आहे. नोंदणीस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. तीन दिवसात सुमारे १ हजारांहून अधिक नवं मतदारांनी नोंदणी केली. नागरिकांमधील मतदानास घेऊन झालेल्या जागृतीमुळे नोंदणीचे प्रमाण वाढल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले. आगामी विधानसभा निवडणूकीनिमित्ताने सरकारतर्फे मतदार यादी विशेष पुनर्परीक्षण मोहीम सर्वत्र सुरू आहे. (Registration of one thousand new voters in 3 days )

जुने नाशिक परिसरातही मुलतानपूरा, चौक मँडई, राजवाडा, कथड़ा तसेच नानावली अशा पाच ठिकाणी गेल्या तीन दिवसापासून नवमतदार नोंदणी काँग्रेस पक्षातर्फे केली जात आहे. मतदारांना त्यांच्या हक्काची जाणीव करून देत मतदान प्रक्रियेबद्दल जनजागृती करण्यात आल्याने नागरिकांचा या पाचही केंद्रांवर मतदान नोंदणीस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. प्रति केंद्रात दैनंदिन दोनशे ते २५० नवमतदार नाव नोंदणी करत आहे. गेल्या तीन दिवसात एक हजाराहून अधिक नव मतदारांनी नाव नोंदणी केली आहे. त्यात तरुणांसह महिलांची मोठी संख्या आहे. (latest marathi news)

Crowd of new voters for voter registration.
Voter Registration : पुणे जिल्ह्यातील भटक्या, विमुक्तांसाठी होणार खास मतदार नोंदणी मोहीम

विशेष म्हणजे नागरिक स्वतःहून नोंदणी केंद्रावर भेट देत मतदान यादीत नाव नोंदणी करून घेत आहे. नोंदणीस मिळणारा प्रतिसाद आणि लोकसभा निवडणुकीत येथील नागरिकांनी केलेले मतदान बघता यंदाच्या विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्था अर्थात महापालिकेच्या निवडणुकीचा मतदानचा टक्का वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मतदानास घेऊन नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर जनजागृती झाल्याचे नोंदणीच्या प्रतिसादातून स्पष्ट होत आहे. पूर्वी मतदान केलेले परंतु लोकसभा निवडणुकीत मतदार यादीतून अचानक नाव कट झाले. अशा अनेक मतदारांचाही सध्या सुरू असलेल्या नोंदणीत समावेश आहे.

Crowd of new voters for voter registration.
Nashik New Voter Registration: 5 वर्षांत पावणेदोन लाख मतदारांची वाढ; 25 हजार युवकांची भर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com